Sukesh Chandrashekhar Valentine Day : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो 'व्हॅलेंटाईन डे' मुळे. सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला 'व्हॅलेंटाईन डे' चे गिफ्ट म्हणून एक प्रायव्हेट जेट दिले आहे. या गिफ्टसह सुकेशने जॅकलीनला एक प्रेमपत्र देखील लिहीले आहे. प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून का दिले याचे कारण देखील त्याने या पत्रात सांगितले आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये 200 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. सुकेश चंद्रशेखर भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा गुन्हेगार आहे. सुकेशने 'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने जॅकलीनला प्रायव्हेट जेट बेट म्हणून दिले आहे. या खाजगी जेटचे नाव जॅकलिनच्या नावाच्या आद्याक्षरांवरून म्हणजेच JF असे ठेवण्यात आले आहे. तसेच, त्याचा नोंदणी क्रमांक देखील जॅकलिनच्या जन्म महिन्यावरून घेतला आहे. हे पूर्णपणे कस्टमाइज्ड प्रायव्हेट जेट असल्याचा दावा सुकेशने केला आहे.
या प्रायव्हेट जेटसह पाठवलेल्या पत्रात सुकेशने जॅकलीनला 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तू तुझ्या कामासाठी आणि शूटिंगसाठी जगभर प्रवास करतेस. आता या जेटमुळे तुझा प्रवासाचा त्रास कमी होईल असे सुकेशने पत्रात म्हंटले आहे. तसेच सुकेशने या पत्रात जॅकलीनसाठी खास संदेश देखील दिला आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला माझी फक्त एकच इच्छा आहे की जर माझा पुनर्जन्म झाला तर मी तुमचे हृदय बनू इच्छितो. कायम मी तुझ्या हृदयात धडधडत राहीन. माझी आई आणि मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहोत कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर व्यक्ती आहे असे त्याने पत्रात म्हंटले आहे. जॅकलीनला देत असलेल्या भेटवस्तूचा खर्च त्याच्या कर विवरणपत्रातून भरेल असा दावा सुकेशने त्याच्या पत्रात केला आहे.
जॅकलिन त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि दोघेही लग्नाची तयारी करत होते असा दावा सुकेशने केला आहे. सुकेशने जॅकलीनला अनेक कोट्यावधी रुपयांच्या महागड्या वस्ती गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. जॅकलिन एकेकाळी सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती असे तपासात समोर आले होते. यामुळे जॅकलीनची देखील चौकशी झाली. सुकेश हा फसवणूक करणारा आहे हे तिला माहित नव्हते असा जबाब जॅकलीनने पोलिस तपासात दिला आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
ITA
(19.3 ov) 123
|
VS |
NEP
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(19.3 ov) 123
|
VS |
ITA
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.