Govinda Extra Marital Affair : 61 वर्षीय गोविंदाचं अफेयर? पत्नी सुनीताला शंका नाही, तर विश्वास; म्हणाली 'मूर्ख महिलेसाठी घर...'

Govinda Extra Marital Affair: गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाचा चर्चा रंगल्या होत्या. सुनीता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही केला होता. आपल्या संसारात सगळं आलबेल असल्याचं वक्तव्य करणाऱ्या सुनीता यांनी गोविंदा यांच्या अफेयरबद्दल भाष्य केलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 15, 2025, 04:41 PM IST
Govinda Extra Marital Affair : 61 वर्षीय गोविंदाचं अफेयर? पत्नी सुनीताला शंका नाही, तर विश्वास; म्हणाली 'मूर्ख महिलेसाठी घर...'

Govinda Extra Marital Affair : अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही त्यांच्या लव्ह लाइफ आणि वैवाहिक आयुष्यामुळे अचानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 38 वर्षांच्या संसारानंतर हे दोघे घटस्फोट घेणार आहेत, अशी बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर गोविंदा यांचं विवाहबाह्य संबंध असल्याच्या बातम्यांनी डोक वर काढलं होतं. पण पत्नी सुनीता यांनी या बातमीचं खंडन करून या विषयाला पुर्नविराम दिलं होतं. पण अचानक सुनीता यांनी नुकताच या विषयावर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा गोविंदाच्या अफेयरबद्दल चर्चा सुरु झाली आहे. 

पत्नी सुनीताला शंका नाही, तर विश्वास…!

डेक्कन टॉक्स विथ आसिफशी झालेल्या मुलाखतीत सुनीताने गोविंदासोबतच्या तणावाचे संकेत दिलं आहेत. या मुलाखतीत सुनीता यांना गोविंदासोबतच्या नात्याबद्दल विचारलं असताना त्या म्हणाल्यात की, 'कोणाची तरी वाईट नजर लागली आहे.' सुनीता पुढे म्हणाल्यात की, आमच्या प्रेमाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. ती कोणालाही तिचा नवरा हिरावून घेऊ देणार नाही. जोपर्यंत जी जिवंत आहे, तोपर्यंत ती गोविंदाला वेगळं होऊ देणार नाही. मग कोणीही मध्ये आलं तरीही ती गोविंदाला सोडणार नाही. तर पूर्वी गोविंदावर विश्वास ठेवायची. पण आता तो विश्वास राहिला नाही. सुनीता यांच्या या विधानानंतर यूर्जसने अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांकडे इशारा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

'माझ्या सासूमुळे मी...'

सुनीता या पुढे म्हणाल्या की, गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नात माझ्या सासूची महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा माझं गोविंदाशी लग्न झालं तेव्हा ते एका मोठ्या कुटुंबात राहत होते. आणि मी त्यांच्यावर प्रेम करत होती. मी आजही सासूमुळे गोविंदाच्या घरी राहत आहे. सासूची इच्छा होती आम्ही लग्न करावं. त्यांनी गोविंदाला म्हटलं होतं की, चीची तू सुनीताला सोडलं तर, तो भिखारी होईल. मला हे वाक्य आजही आठवतं.'

'मूर्ख महिलेसाठी घर...'

सुनीता या पूर्वी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, ज्या दिवशी हे गोविंदाच्या अफेयरबद्दल मी किंवा गोंविदा सांगू तेव्हा बघू. पण मला वाटतं की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही. तर मीही गोविंदाशिवाय राहू शकत नाही. गोविंदा एका मूर्ख बाईसाठी कधीही त्यांचं कुटुंब सोडणार नाही.'

गोविंदाचं 'या' अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध!

दरम्यान जेव्हा रेडिटवरील एका पोस्टमध्ये गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाचा दावा करण्यात आला होता. पण ही पोस्ट नंतर डिलिट करण्यात आली होती. पण या पोस्टनंतर मात्र नेटकऱ्यांनी गोविंदाचं कोणासोबत अफेयर आहे याबद्दल चर्चा सुरु केली. एवढंच नाही तर एका युजरने लिहिलं की, गोविंदाचं प्राजक्ता माळी किंवा गिरिजा जोशीसोबत अफेयर असू शकतं.