)
Sunny Deol Gabaru Movie: दमदार डायलॉग आणि अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा धडाकेबाज अभिनेता म्हणजे सनी देओल आज त्याचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. सनी देओलने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली असून सनी देओल त्याचा बहुप्रतिक्षित 'गबरू' चित्रपट घेऊन येत आहे. त्याने चित्रपटाचा पहिला लूक देखील शेअर केला आहे. चित्रपटाची पहिली झलक पाहून हे स्पष्ट होते की चित्रपट खूपच भावनिक असेल एवढेच नाही तर शेवटपर्यांत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल.
अभिनेता सनी देओल शनिवारी अटारी सीमेवर पोहोचला. त्याने प्रथम सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेतली आणि नंतर 'बीटिंग रिट्रीट समारंभ पाहिला. त्याने या दरम्यान काढलेले फोटो तुफान व्हायराल होत असून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आता सनीने प्रेक्षकांना गबरु चित्रपटा घोषणा करुन दुसरा आनंदाचा धक्का दिला.
हा पाहा पहिला लूक
Power isnt what you show, its what you do!
— Sunny Deol (@iamsunnydeol) October 19, 2025
Thank you everyone for your love and blessings , here's something for you all who have been waiting #Gabru IN CINEMAS 13th March 2026
A story of courage, conscience, and compassion.
From my heart… to the world! pic.twitter.com/D8qnhet7SN
सनी काय म्हणाला?
तुम्ही पाहु शकता गबरु या चित्रपटाचा पहिला लूक हा ह्र्दयस्पर्शी आहे त्यासोबतच एक अतिशय भावनिक पोस्टदेखील केली आहे.
त्याच्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, " सामर्थ्य म्हणजे तुम्ही दाखवत ते नाही, तर तुम्ही जे करता ते असते. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. तुम्ही सर्वजण ज्याची वाट पाहत होता, त्या 'गबरु'ची धैर्य, शहाणपण आणि करुणेची कहाणी. माझ्या हृदयापासून जगापर्यंत." सनी देओलने अधिकृतपणे त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली.
सनी देओल सध्या यशस्वी कारकिर्दीचा आनंद घेत आहे. त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असून गदर 2 नंतर त्याच्या कारकिर्दीत लक्षणीय वाढ झाली. त्याच्या 'जाट' चित्रपटालाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. सनी देओल आता 'बॉर्डर 2' मध्ये दिसणार आहे. महत्तवाची बाब म्हणजे या चित्रपटात दिलजीत दोसांझ, मोना सिंग, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या लक्षणीय भूमिका आहेत.