'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये सलमान खान - कॅटरिना कैफचा दिसतोय कूल अंदाज

  रोमान्स आणि अ‍ॅक्शन हा ' टायगर  जिंदा है' चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

Updated: Nov 21, 2017, 01:17 PM IST
'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये सलमान खान - कॅटरिना कैफचा दिसतोय कूल अंदाज

मुंबई :  रोमान्स आणि अ‍ॅक्शन हा ' टायगर  जिंदा है' चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

आता या चित्रपटातील पहिलं गाणं 'स्वॅग से स्वागत' हे पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे. 

 

'स्वॅग से स्वागत' चित्रपटामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफचा कूल अंदाज दिसत आहे. विशाल ददलानी आणि शेखर यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर हे गाणं विशाल ददलानी आणि नेहा भसीन या दोघांनी गायलं आहे. 

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांना एकत्र पडद्यावर पाहण्याची रसिकांची उत्सुकता ' टायगर जिंदा है' या चित्रपटात पूर्ण होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सुमारे ४० मिलियन हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

'एक था टायगर' चित्रपटाचा हा सिक्वेल असल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे शूटींग ऑस्ट्रिया, ग्रीस, दुबई येथे करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानचे स्पाय म्हणजेच गुप्तहेर असणारे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे दोघेही आपलं करिअर आणि काम कसं सांभाळतात हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांंची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.