अभिनेता दर्शिल सफारीने आमीर खानसह 2007 मध्ये आलेल्या तारे जमीन पर (Taare Zameen Par) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्णण केलं होतं. दरम्यान मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत, दर्शिलने आपण आमीर खानकडे काम का मागत नाही याचा खुलासा केला आहे. दर्शिलने खुलासा केला आहे की, कोविडनंतर आपण जे काही प्रोजेक्ट केले ते सर्व कोणत्याही ओळखींशिवाय केले. यादरम्यान त्याने 'तारे जमीन पर'चा सिक्वेल 'सितारे जमीन पर'वरही भाष्य केलं.
दर्शिलने खुलासा केला की, मी आमीर खानकडे काम मागत नसल्याने लोक नाराज होतात. तसंच आपण काही एकमेकांचे भाऊ नसून, काम मागताना लाज वाटते असंही सांगितलं. तो म्हणाला, "मी करोनानंतर जे काही काम केलं आहे, त्यासाठी ओळखींचा वापर केला नाही. ऑडिशन आणि स्क्रीन टेस्टमुळे मला ती भूमिका करु शकतो की नाही हे समजून घेण्यात मदत झाली. तसंच निर्माते आणि दिग्दर्शकांना मी त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही हे समजण्यातही मदत होते".
"मी आमीरकडे काम मागत नसल्याने लोक नाराज होता. पण मला तसं करण्यास फार लाज वाटते. तो माझा भाऊ नाही, ज्याला मी फोन करुन सांगेन की माझ्यासाठी स्किप्ट आण. मी जो मार्ग निवडला आहे त्यावरुन त्याला फक्त शुभेच्छा देऊ शकतो. जसं की त्याच्या वाढदिवसाला मेसेज करणं. मी हे असंच ठरवलं आहे," असं तो म्हणाला.
2007 चा हा चित्रपट आमिरने निर्मित आणि दिग्दर्शित केला होता. आमिर आणि दर्शिल यांच्याव्यतिरिक्त त्यात तनय छेडा, विपिन शर्मा आणि टिस्का चोप्रा यांनीही भूमिका केल्या होत्या.
शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने 30 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिरने अपर्णा पुरोहित आणि रवी भागचंदका यांच्यासोबत केली आहे.
दिव्य निधी शर्मा यांनी लिहिलेला हा 'सितारे जमीन पर' समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या विषयांवर केंद्रित आहे. आमिर एका बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारतो जो चित्रपटात दहा दिव्यांगांना मार्गदर्शन करतो. आमिरसोबत, या चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांच्याही भूमिका आहेत.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
209/3(58.5 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.