तापसी आणि भूमिचा गोवऱ्या थापताना फोटो व्हायरल

तापसी यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाल्याचे दिसत आहे.

Updated: Mar 12, 2019, 12:35 PM IST
तापसी आणि भूमिचा गोवऱ्या थापताना फोटो व्हायरल title=

मुंबई : मागील काहीदिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू चांगलीच चर्चेत आहे. 'पिंक' सिनेमानंतर प्रकाश झोतात आलेल्या तापसीच्या 'बदला' सिनेमाने चाहत्यांवर एक प्रकारे भूरळच घातली आहे. सध्या तापसी यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाल्याचे दिसत आहे. ती सध्या 'सांड की आंख' सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे. अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि तापसी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या दोघींचा एक फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये या दोन्ही तारका गोवऱ्या थापताना दिसत आहेत. 

ग्रामीण भागात गाई-म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. भूमिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तापसी आणि भूमिने संपूर्ण भिंतीवर गोवऱ्या थापताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'के ख़ुस्बू आन लाग री है...... दिखे कुछ कमाल का पक रेहा है.... #SaandKiAankh' असे लिहले आहे.

PICS: अब दुनिया की सबसे बुजुर्ग निशानेबाजों की भूमिका निभाएंगी तापसी और भूमि 

सूत्रांनी सांगितल्यानूसार, सिनेमात तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार असून 'मुक्काबाज' फेम अभिनेता विनीत सिंग सुद्धा सिनेमात आपली व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याचप्रमाणे सिनेमात प्रकाश झा अभिनय करताना दिसणार आहेत. सिनेमाची कथा शॉर्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या यशोगाथेवर बेतलेली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन तुषार हीरानंदानी करत असून सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यप यांची आहे. तापसी-भूमि पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.