Tejasswi Prakash आणि Karan Kundra चा लग्नाआधी मुलांचा विचार?
बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सर्वत्र चर्चेत आहेत. शोमध्ये असल्या पासूनच हे लव्हबर्ड्स सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधत आहेत.
मुंबई : बिग बॉस 15 फेम तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सर्वत्र चर्चेत आहेत. शोमध्ये असल्या पासूनच हे लव्हबर्ड्स सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधत आहेत. तेजस्वी तिच्या 'नागिन 6' या शोमध्ये व्यस्त आहे, तर करण देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे, तरीही दोघेही एकमेकांसाठी वेळ काढताना दिसतात आणि दोघांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.
सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगत आहेत. एवढंच नाही तर, लग्नाअधी दोघांनी मुलांची देखील प्लानिंग केली आहे. एका मुलाखतीत करण म्हणाला, 'मला तेजस्वीकडून एक मुलगी हवी आहे आणि मला माहिती आहे की, मी एक उत्तम वडी होवू शकतो...'
तो पुढे म्हणाला, 'मला एक मुलगी हवी आहे, पण तेजस्वीला 25 मुलं हवी आहेत. माझ्या बहिणींची मुलं आणि माझं फार चांगलं नातं आहे. त्यामुळे माझ्या मुलांचा मी उत्तम सांभाळ करू शकतो....'
करण आणि तेजस्वीबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी करण कुंद्रा आपल्या कुटुंबासह तेजस्वीच्या घरी गेला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेजस्वी प्रकाशच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला करण कुंद्रा त्याच्या आई-वडिलांसोबत पोहोचला होता.