'थंडी वाजून ताप आला आणि...', असं म्हणताना आईच्या आठवणींनी तेजस्विनीच्या डोळ्यात अश्रू दाटले, भावूक होत ती म्हणाली 'मला आणि माझ्या...'

Tejaswini cries talking about her mother - आईच्या आठवणींनी तेजस्विनी पंडितच्या डोळ्यांत अश्रू दाटले, ती म्हणाली "अचानक तीन...'

Intern | Updated: Oct 16, 2025, 01:28 PM IST
'थंडी वाजून ताप आला आणि...', असं म्हणताना आईच्या आठवणींनी तेजस्विनीच्या डोळ्यात अश्रू दाटले, भावूक होत ती म्हणाली 'मला आणि माझ्या...'

मराठी सिनेविश्वातल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली. ज्योती चांदेकर गेल्या अडीच वर्षांपासून लोकप्रिय मालिकेत ‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. मालिकेच्या सेटवर प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी काम करणं सुरूच ठेवलं होतं. त्यांच्या भूमिकेने प्रत्येक रसिकाच्या मनावर ठसा उमटवला होता.

Add Zee News as a Preferred Source

ज्योती चांदेकर यांना गेल्याला आता दोन महिने झाले आहेत. नुकतीच अभिनेत्री तेजस्विनी पंडित एका कार्यक्रमात सहभागी झाली असता तिने आईच्या आठवणी शेअर केल्या. आईविषयी बोलताना ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले. तेजस्विनी म्हणाली, 'एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे आई-वडील तुमच्यासोबत असतील तर त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला तिच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. आमचे वडील गेले तेव्हाही अनेक गोष्टी अपूर्ण राहिल्या. म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की, आईबरोबर सगळं करू. पण 16 ऑगस्टला आई गेली... तिचा वाढदिवस ३१ ऑगस्टला होता. त्या दिवशी आम्ही तिच्यावर आधारित पुस्तक प्रकाशित करणार होतो. पण अचानक तीन दिवसांत सगळं बदललं. १२ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि 16 तारखेला ती गेली.'

भावनांनी भारावून तेजस्विनी पुढे म्हणाली, 'आईला थंडी वाजली आणि ताप आला, हेच कारण होतं. त्यानंतर तीन दिवसांत ती आम्हाला सोडून गेली. म्हणून मी सगळ्यांना सांगते, जर काही गोष्टी तुम्ही आई-वडिलांबरोबर करण्याचं ठरवलं असेल, तर त्या करा. कारण आयुष्याचं काहीही निश्चित नाही.' आईच्या कारकिर्दीबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली, 'आईचा कलाविश्वातील प्रवास जवळपास 50 वर्षांचा आहे. नाटकातून तिच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि नंतर सिनेमा, मालिका अशा सगळ्या माध्यमांत तिने आपला ठसा उमटवला. ती ज्या माध्यमात काम करत होती, त्या वर्षीचे पुरस्कार घरात असायचे. तिच्या पोटी जन्माला येणं हे माझं अहोभाग्य आहे. तिचं कार्य पुढे नेण्याचा मी प्रयत्न करते.'

ज्योती चांदेकर यांच्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांना हसवलं, रडवलं आणि विचार करायलाही लावलं. त्यांच्या जाण्यानं मराठी कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
FAQ
ज्योती चांदेकर यांचे निधन कधी झाले?
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे 16 ऑगस्ट रोजी पुण्यात निधन झाले.

तेजस्विनी पंडितने आईच्या निधनाबद्दल काय सांगितले?
तेजस्विनी म्हणाली की, 'आईला थंडी वाजून ताप आला, आणि फक्त तीन दिवसांत ती आम्हाला सोडून गेली.' तिने सर्वांना सल्ला दिला की, आई-वडिलांसोबतच्या क्षणांना कधीही पुढे ढकलू नका.

ज्योती चांदेकर यांचा कलाप्रवास कसा होता?
त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास जवळपास 50 वर्षांचा होता. नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या, आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

About the Author