मुंबई : महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अनेकदा बोललं गेलं आहे. अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडूनही काही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. पण, या परिस्थितीमध्येसुद्धा काही महाभाग मात्र त्यांच्या दुष्कृत्यांपासून दूरावलेले नाही हेसुद्धा नाकारता येणार नाही. अशाच एका व्यक्तीचा सामना लोकप्रिय अभिनेत्रीने केला होता. ज्याला तिने एक सणसणीत चपराक लगावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री म्हणजे 'ये है मोहोब्बते' फेम, दिव्यांका त्रिपाठी. एका सिनेमागृहात तिला अशा अडचणीच्या प्रसंगाचा सामना करावा लागला होता. झी न्यूजच्या वृत्तानुसार, सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकीटं ब्लॅकने मिळण्याचा तो काळ होता. त्यावेळी त्या ठिकाणी फारच गर्दी झाली होती. तिथेच दिव्यांका तिकीचासाठी उभी होती, तेव्हा एका व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत तिचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. 


आपल्याला स्पर्श करणाऱ्या त्या व्यक्तीचं कृत्य पाहून दिव्यांकाचा संताप अनावर झाला. त्याचविषयी सांगताना दिव्यांका म्हणाली, 'तो गर्दीतून पळ काढण्याच्या प्रयत्नांत होता. पण, मी त्याचा हात पकडला आणि गर्दीतून त्याला बाहेर खेचलं आणि त्याच्या सणसणीत चपराक लगावली. तोपर्यंत लोकांनीही पुढे येऊन त्याला चांगलाच धडा शिकवला होता'.


 



दिव्यांकाच हा अनुभव बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. पण, मुळात महिला सुरक्षिततेचा प्रश्न मात्र आजही ऐरणीवर आहेत. आजही गर्दीच्या ठिकाणी महिलांना अशा कैक प्रसंगांचा सामान करावा लागतो. एकंदरच काय, तर काळ पुढे आला असला तरीही हे चित्र अजूनही बऱ्याच अंशी बदलण्याची गरज आहे हेच खरं.