`एवढाच` होता कुशल बद्रिकेचा पहिला पगार... डोळ्यात पाणी आणत अभिनेत्याकडून स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा
सध्या अभिनेता ``मॅडनेस मचायेंगे`` या कार्यक्रमात झळकताना दिसतोय. याच मंचावर त्याच्यासोबत स्पीन गेम खेळण्यात आला.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घरा घरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रिके कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. कुशल नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. अभिनेत्याचं लिखाण कायमच प्रेक्षकांना आकर्षित करत असतं. सध्या अभिनेता ''मॅडनेस मचायेंगे'' या कार्यक्रमात झळकताना दिसतोय. याच मंचावर त्याच्यासोबत स्पीन गेम खेळण्यात आला. यावेळी हुमा खुरेशीने स्पीन फिरवायला सुरुवात केली आणि निशाणा पहिल्या फिल्मवर येवून थांबला. यानंतर हुमा खुरेशीने कुशलला विचारला तुझा पहिला सिनेमा? खरंतर कुशलने जत्रा सिनेमातून सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. २००५ साली आलेला हा सिनेमाचा चाहता वर्ग आजही तितकाच आहे.
जत्रा सिनेमातून सगळेच कलाकार आज एका उंचीवर आहेत. या सिनेमाचा सिक्वेल यावा अशी ईच्छाही कुशलने या मंचावर व्यक्त केली. शेअर केलेल्या व्हिडीओत कुशल भावूक होताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत कुशलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''ही गोष्ट मी कधीच कुठे share केली नव्हती; म्हणजे तसं काही जुळूनच आलं नाही कधी. आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. नाही का ? पहिलं प्रेम, पहीली नोकरी, पहिली गाडी, पहिलं घर… तसंच ही माझी माझी “पहिली फिल्म” जत्रा ! केदार सर तुम्ही संधी दिलीत आणि आयुष्याचं सोनं झाल. (आता सोनी झाली असं म्हणायला हरकत नाही.) भरत दादा तुम्ही कायम संभाळून घेतलंत. बाकी मोन्या, सिध्दू, संज्या, रम्या, गण्या ह्यांना सांगू नका हां, माझं नाव कुश्या आहे ते.''
सध्या कुशलचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कुशलच्या या व्हिडीओवर कलाकारांसोबतच त्याचे चाहतेही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कमेंट करत लिहीलं आहे की, Kushal तू खूप भारी आहेस… I’m so happy की हे आता पूर्ण देशाला नव्हे, तर जगाला कळतंय. तर संतोष जुवेकर म्हणालाय, कुश्या love u भावा. तर सिद्धर्थने कमेंट केलीये की, फक्त आय लव्ह यू भावा. तर अनेक चाहतेही या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, तुला गच्च मिठी आणि गच्च पप्पी. तर अजून एकाने लिहीलंय, आयुष्यात मागे वळून बघितलं की महाकाव्ये ही फिके वाटायला लागतात. भावनेला व्यक्त शब्द भेटत नाही हेच खरं. तर अजून एकाने लिहीलंय, कुश्या म्हणूनच तू भारी आणि वेगळा आहेस.....काय बोलू राव. अशा अनेक प्रकारच्या कमेंट युजर्स कुशलच्या पोस्टवर करत आहेत.