दोन चित्त्यांना दत्तक, एका बेबी गेंड्याला दिलं स्वत:चं नाव... फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलत का?

This Actress Adopted 2 Cheetahs : या चिमुकलीनं दोन चित्त्यांना घेतलं दत्तक, एका बेबी गेंड्याला दिलं स्वत:चं नाव

दिक्षा पाटील | Updated: May 9, 2025, 02:34 PM IST
दोन चित्त्यांना दत्तक, एका बेबी गेंड्याला दिलं स्वत:चं नाव... फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलत का?
(Photo Credit : Social Media)

This Actress Adopted 2 Cheetahs : सध्या सोशल मीडियावर या फोटोमध्ये दिसलेल्या मुलीची चर्चा सुरु आहे. तुम्ही तिला ओळखलंत का की कोण आहे ही चिमुकली जी मोठी होऊन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरली. या अभिनेत्रीनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय निसर्गावर असलेल्या प्रेमासाठी ओळखली जाते. इतकंच नाही तर तिनं दोन वेळा लग्न केलं असून तिचं आणि तिच्या सावत्र मुलीमध्ये असलेल्या गोड नात्यामुळे चांगलीच चर्चेत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी...

फोटोत दिसणारी ही चिमुकली सगळ्यांच्या आवडती अभिनेत्री दिया मिर्झा आहे. तिचा हा फोटो तिची मैत्रिण आणि अभिनेत्री शबाना आजमी यांनी 2023 मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. ज्यावेळी शबाना आजमी यांनी हा फोटो शेअर केला त्यावेळी त्यांनी देखील ही कोण आहे तुम्ही ओळखलत का असा सवाल केला होता. पण दिया मिर्झाच्या चाहत्यांनी तिला लगेच ओळखलं. 

कोण आहेत दियाचे वडील Frank Handrich?

दिया मिर्झा ही 43 वर्षांची आहे. तिचा जन्म हा हैदराबादमध्ये झाला तर तिचे वडील हे जर्मनचे असून त्यांचे नाव Frank Handrich होते. ते एक डिझायनर होते तर तिची आई दीपा बंगाली होती. जेव्हा दिया ही साडेचार वर्षांची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिची आईनं अहमद मिर्झा यांच्याशी दुसरं लग्न केलं. दीयानं तिच्या नावा पुढे त्यांचंच नाव लावलं. तर तिच्या आईचं 2003 मध्ये निधन झालं. 

शिक्षण ते करिअर

दिया मिर्झानं हैदराबादमध्ये शालेय आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॉडेलिंग आणि टीव्ही जाहिरातींमध्ये दिया मिर्झा दिसली. 2000 मध्ये मिस इंडिया या ब्युटी पेजेंटमध्ये ती सेकेंड रनरअप ठरली होती. त्यानंतर दिया ही 'रहना है तेरे दिल से' या चित्रपटामध्ये दिसली. याच चित्रपटातून दियानं तिच्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर ती 'दीवानापन', 'तुमको ना भूल पाएंगे', 'तुमसा नहीं देखा', 'संजू' सारख्या चित्रपटांमध्ये आणि 'काफिर' या वेब सीरिजमध्ये ती दिसली. 

चित्त्याच्या शावकांना दत्तक ते गेंड्याच्या वासरुला दिलं स्वत:चं नाव

दिया मिर्झाचं पर्यावरणावर किती प्रेम आहे याविषयी तर सगळ्यांनाच ठावूक आहे. तिला झाडं-झुडपं, प्राण्यांवर खूप प्रेम आहे. तिनं 2010 मध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊच्या प्राणी संग्रहालयात चित्तेच्या दोन शावकांना दत्तक घेतलं. तिनं त्यांना अशोक आणि नक्षत्र अशी नावं दिली आहेत. तर या शावकांच्या आईचं नाव दिया आहे. तर तिनं गेंड्याच्या वासरुचं नाव देखील तिच्या नावावर ठेवलं आहे. 

दिया मिर्झाचं खासगी आयुष्य

दिया मिर्झाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर 2014 मध्ये तिनं बिझनेस पार्टनर साहल संघासोबत साखरपुडा केला आणि नंतर लग्न केलं. पण 2019 मध्येच ते दोघे विभक्त झाले. तर फेब्रुवारी 2021 मध्ये दिया मिर्झानं बिझनेसमॅन वैभव रेखी याच्यासोबत दुसरं लग्न केलं. तर त्याचवर्षी 2021 मध्ये दीयानं सांगितलं की 14 मे रोजी तिनं एक बाळाला जन्म दिला. त्या बाळाचं नाव अव्यान आजाद ठेवल्याचं तिनं सांगितलं. ते बाळ प्री-मच्योर डिलिव्हरी झाल्यामुळे 2 महिन्यांपर्यंत NICU मध्ये होतं. तर वैभव रेखीला त्याच्या पहिल्या लग्नातून मुलगी असून तिचं नाव समायरा आहे. 

नेटवर्थ

दिया मिर्झाच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर तिची एकूण संपत्ती ही 22 कोटी आहे. तर तिचा नवरा वैभवची एकूण नेटवर्थ ही 70-80 कोटींची आहे.