`The Kashmir Files` मुळे मोठं नाव अडचणीत; या व्यक्तीला तातडीनं Y दर्जाची सुरक्षा
सिनेमाची कामगिरी प्रशंसनीय असतानाच कोणाला मिळलं हे सुरक्षाकवच?
मुंबई : सध्या सर्वत्र 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमाच्या माध्यामातून केला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असताना दुसरीकडे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना गृहमंत्रालयाकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
याचा अर्थ आता विवेक अग्निहोत्री पूर्ण भारतात कोठेही गेल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी CRPF चे जवान असतील. दरम्यान सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमा पाहून अनेकांना गहीवरून देखील आलं. अनेक जण सिनेमाच्या विरोधात आहेत.
काय असते Y दर्जाची सुरक्षा
Y श्रेणीच्या सुरक्षेमध्ये व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एकूण 8 सुरक्षा रक्षक तैनात असतात. यामध्ये व्हीआयपींना सुरक्षा दिली जाते. एवढंच नाही तर तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात.
बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा बोलबाला...
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतचं एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. बुधवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर 19 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमाने आतापर्यंत जवळपास 79 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 100 कोटींचा गल्ला पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे.