18 कोटीचं मंडप, कोटी रुपयाची साडी, 'या' अभिनेत्याचं सर्वात महागडं लग्न; तरी देखील वधुवरुन उडाला एकच गोंधळ

बॉलिवूडमध्ये अनेक भव्य आणि आकर्षक अशी लग्ने झाली आहेत, पण एका अभिनेत्याचे लग्न सर्वात महागडे असल्याच सांगितलं जातं. या अभिनेत्याच्या लग्नाला तब्बल २००० पाहुणे उपस्थित होते. लग्न सोहळ्याला एकूण १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि वधूलाही करोडो रुपयांचे कपडे आणि दागिने घालून सजवण्यात आले होते. मग माशी कुठे शिंकली? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 20, 2025, 10:54 PM IST
18 कोटीचं मंडप, कोटी रुपयाची साडी, 'या' अभिनेत्याचं सर्वात महागडं लग्न; तरी देखील वधुवरुन उडाला एकच गोंधळ

भारतातील लग्न, मग ते सामान्य लोकांचे असोत किंवा सेलिब्रिटींचे, नेहमीच भव्य दिव्य असते. लग्नांमध्ये भव्यता आणि वैभव दिसून येते. पण लग्न सोहळा जेव्हा एका अभिनेत्याचा असतो तेव्हा कोट्यावधी रुपये खर्च होणे ही सामान्य बाब आहे. मग डिझायनर कपडे असोत, आलिशान ठिकाण असोत किंवा हजारो पाहुण्यांसह उत्सव असोत. अनुष्का शर्मा-विराट कोहली, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा-निक जोनास आणि कतरिना कैफ-विकी कौशल यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड जोडप्यांचे लग्न या भव्यतेची उदाहरणे आहेत.

या अभिनेत्याचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले

जर आपण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल बोललो तर, सर्वात भव्य लग्नाचा किताब आरआरआर फेम ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रणती यांच्या लग्नाला जातो. हे लग्न त्या वर्षातील सर्वात मोठी बातमी तर ठरलेच, पण देशातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एकही ठरले. ५ मे २०११ रोजी, ज्युनियर एनटीआर यांनी प्रसिद्ध उद्योगपती नार्णे श्रीनिवास राव यांची मुलगी लक्ष्मी प्रणती हिच्याशी लग्न केले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या लग्नाचे एकूण बजेट सुमारे १०० कोटी रुपये होते. या समारंभात सुमारे ३००० सेलिब्रिटी आणि १२०० चाहते उपस्थित होते. विशेष म्हणजे लग्नासाठी तयार केलेल्या भव्य मंडपाच्या सजावटीसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च आले.

लग्नात वधूच्या वयावरून वाद 

वधूने तिच्या लग्नात एक अतिशय सुंदर सोन्याची कांजीवरम साडी घातली होती, ज्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. तर ज्युनियर एनटीआरने पारंपारिक पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान करून साधेपणातही शाही शैली स्वीकारली. या लग्नापूर्वी एक कायदेशीर वादही निर्माण झाला. जेव्हा त्या दोघांचे लग्न झाले तेव्हा लक्ष्मी फक्त १७ वर्षांची होती. यावर वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी बालविवाह कायद्याअंतर्गत अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. वाद टाळण्यासाठी, ज्युनियर एनटीआरने लक्ष्मी १८ वर्षांची होईपर्यंत वाट पाहिली आणि नंतर लग्न केले.

हा अभिनेता दोन मुलांचा बाप

लग्नाच्या काही वर्षांनंतर, २०१४ मध्ये जेव्हा या जोडप्याने त्यांचा पहिला मुलगा अभय रामला जन्म दिला. तेव्हा हे नाते आणखी घट्ट झाले. नंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, ज्याचे नाव भार्गव होते. आज हे जोडपे केवळ वैयक्तिकरित्या आनंदी नाही तर चाहत्यांमध्ये एक आदर्श जोडपे मानले जाते.