12 वर्षांमध्ये एक हिट चित्रपट नाही, तरीही संपत्ती 1200 कोटी रुपये, कोण आहे हा अभिनेता?

बॉलिवूडमध्ये एका सुपरस्टारचा मुलगा ज्याने 12 वर्षात एकही हिट चित्रपट दिला नाही. तरी देखील आहे 1200 कोटींचा मालक. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jun 23, 2025, 08:06 AM IST
12 वर्षांमध्ये एक हिट चित्रपट नाही, तरीही संपत्ती 1200 कोटी रुपये, कोण आहे हा अभिनेता?

Bollywood Actor: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताच पहिला हिट चित्रपट दिला आहे. तर काहींना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. परंतु, बॉलिवूडमध्ये असे देखील काही कलाकार आहेत, ज्याचे वडील सुपरस्टार असून देखील त्यांनी आतापर्यंत एकही हिट चित्रपट दिलेला नाही. ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय  यांचा मुलगा  विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये आपल्या पहिल्याच वर्षात 'कंपनी', 'रोड', 'साथिया' या चित्रपटांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना आकर्षित केले. तेव्हापासून विवेक हा संघर्ष करत आहे. 

विवेकने एकामागून एक फ्लॉप चित्रपट दिले. ज्यामध्ये 'किसना: द वॉरियर पोएट', 'प्यारे मोहन', 'होम डिलीवरी', 'मिशन इस्तांबुल आणि प्रिन्स' या चित्रपटाचा समावेश आहे. अभिनेत्याने शेवटचा हिट चित्रपट 2013 मध्ये दिला आहे. या चित्रपटाचे नाव 'क्रिश 3' आहे. ज्यामध्ये त्याने हृतिक रोशनसोबत खलनायकाची भूमिका केली होती.

विवेक ओबेरॉयचा शेवटचा चित्रपट फ्लॉप

अभिनेता विवेक ओबेरॉयचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 'केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ' आहे. हा एक ऐतिहासिक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट मे 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात  अभिनेता सुनील शेट्टी आणि सूरज पंचोली यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे एकूण बजेट 50 कोटी रुपये इतके होते. एंटरटेनमेंट ट्रॅकिंग पोर्टल सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने भारतात फक्त 1.53 कोटी रुपयांची कमाई केली. 

बॉलिवूडमधील अपयशानंतर विवेकचा व्यवसायावर भर 

विवेक ओबेरॉयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरू लागले तेव्हा अभिनेत्याने या सर्व गोष्टी सोडून स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा विचार केला. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, 2009 मध्ये त्याने यावर पूर्णपणे अवलंबून न राहता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अशातच अभिनेत्याने तो दुबईला का गेला याचा खुलासा केला आहे. कोविड-19 च्या आजारानंतर अभिनेता दुबईला गेला आणि त्याने BNW रिअल इस्टेट डेव्हलपमेंट्सची सुरुवात केली.जो UAE मधील लक्झरी प्रॉपर्टीजवर लक्ष केंद्रित करते. विवेकची ही कंपनी अत्यंत यशस्वी झाल्यामुळे विवेकच्या संपत्तीत वाढ झाली. आता त्याची एकूण संपत्ती ही 1200 कोटी रुपये इतकी आहे.