Jacqueline Fernandez Island : भारतीय चित्रपसृष्टीमध्ये असलेले सेलिब्रिटी हे त्यांच्या आलीशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. घर ते सगळ्या सोई-सुविधा आणि त्याशिवाय आलिशान गाड्या. त्यापैकी अनेकांचे तर प्रायव्हेट जेट देखील आहेत. पण तुम्हाला माहितीये का की बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे जिच्याकडे स्वत: चं आयलंड आहे. तिथे तिला एक आलिशान व्हीला बनवायचा होता. पण आता तुम्हाला वाटत असेल की ती प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोण असेल. पण ती अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे. जॅकलिन ही गेल्या 15 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. जॅकलीननं श्रीलंकेच्या दक्षिणी भागात असलेलं एक चार एकरचं द्वीप खरेदी केलं आहे.
जॅकलीननं 2012 मध्ये जमिनीचा हा भाग खरेदी केला होता. रिपोर्ट्सनुसार, तिनं हे आयलंड 3 कोटींना खरेदी केल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार जॅकलीननं हे आयलंड व्हिला बनवण्यासाठी खरेदी केला होता. जॅकलीननं कधी याविषयी कोणती माहिती दिली नाही की हा व्हिला ती स्वत: साठी बनवणार होती की कमर्शिल लीज किंवा भाडेत्त्वार देण्यासाठी बांधणार होती. या गोष्टीवर देखील कोणत्याही प्रकारची माहिती नाही की तिनं जमीन खरेदी केल्यानंतर तिनं या आयलंडसोबत काय केलं. फक्त इतकंच माहित होतं की ती अजूनही या प्रायव्हेट आयलंडची मालकिन आहे.
जॅकलीनच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर ती श्रीलंकेचे माजी ब्यूटी क्वीन आहे. तिनं सगळ्यात आधी मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती. तिनं 2009 मध्ये 'अलादीन' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण 2011 मध्ये 'मर्डर 2' मधील तिच्या भूमिकेनं तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. तिनं पाच वर्षात 'हाउसफुल 2' आणि 'रेस 2' सोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खरंतर, अशी देखील वेळ आली होती की जेव्हा तिचे अनेक चित्रपट हे फ्लॉप झाले होते. दरम्यान, यंदाच्या वर्षाच्या जॅकलीनच्या सुरुवाती विषयी बोलायचं झालं तर सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपट 'फतेह' मध्ये ती दिसली होती. 2025 मध्ये तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'हाउसफुल 5' आणि 'वेलकम टू द जंगल' तर या दोन्ही चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमारची साथ देताना दिसणार आहे.