मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता लवकरच त्याचा 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. 'लाल सिंह चड्ढा'च्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या आहेत. मात्र ट्रेलरनंतर ज्याची खूप चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेत्री मोना सिंग. 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात मोना सिंग आमिर खानच्या आईची भूमिका साकारत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यात आमिर आणि मोना सिंग यांच्या वयात खूप अंतर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोना सिंग या अभिनेत्यापेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. अभिनेत्रीचं वय 40 वर्षे आहे. तर आमिर खान 57 वर्षांचा आहे. ज्यावरून दोघांमधील वयाचं अंतर किती मोठं आहे हे स्पष्ट होतं. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, २९ मे रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला असून, 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा एरिक रॉथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिला आहे. लाल सिंग चड्ढा हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून मानला जातो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा हॉलिवूड स्टार टॉम हँक्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. आमिर खानने 3 इडियट्सच्या टीमसोबत म्हणजेच करीना कपूर खान आणि मोना सिंहसोबत 'लाल सिंह चड्ढा'मध्ये पुन्हा एकदा काम केलं आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य 'लाल सिंग चड्ढा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आमिर खानसह इतर कलाकारांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.