Horror Movie : आपल्या सगळ्यांनाच हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर किंवा पाहताना भीती वाटते. पण आपण तरी सुद्धा ते पाहणं सोडत नाही. त्यातही असे अनेक हॉरर चित्रपट आहेत जे आपल्या मनात आजही छाप सोडून गेले आहेत. खरंतर 2007 मध्ये एक हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अपेक्षे पेक्षा जास्त पसंती दिली की 6 लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटानं जगभरात 800 कोटी कमावले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा कोणता चित्रपट आहे. चला तर आज आपण त्या विषयीच जाणून घेऊया...
खरंतर जेव्हा निर्मात्यांनी या चित्रपटाचा प्रॉफीट पाहिला तेव्हा त्यांनाही विश्वास बसला नाही. कारण या चित्रपटाचं बजेट हे फक्त 6 लाख होतं आणि जगभरात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींची कमाई केली. त्यांनी 2021 पर्यंत या चित्रपटाचे 6 सीक्वल बनवले होते. चला तर जाणून घेऊया हा कोणता चित्रपट आहे.
'पॅरानॉर्मल अॅक्टिविटी' च्या या यशानंतर त्यांनी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर ओरेन पेलीनं 'पॅरानॉर्मल अॅक्टिविटी' च्या 6 सीक्वल्स आणि स्पिनऑफ बनवले. 'पॅरानॉर्मल अॅक्टिविटी' चा पहिला सीक्वल हा 2010 मध्ये, दुसरा सीक्वल हा 2011 मध्ये झाला आणि तिसरा सीक्वल हा 2012 मध्ये आणि चौथा सीक्वल हा 2014 मध्ये, पाचवा सीक्वल हा 2015 मध्ये आणि सहाव्वा सिक्वल हा 2021 मध्ये आला. या चित्रपटांमध्ये फक्त 4 कलाकार होते आणि आयएमडीबीवर या चित्रपटाला 6.3 रेटिंग मिळाल्या आहेत. हे चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या चित्रपटाला पाहताना भीती वाटत असली तरी देखील प्रेक्षक हा चित्रपट आजही पाहतात.
हेही वाचा : कार्तिक आर्यननं खोटं बोलून मिळवला चित्रपट पण प्रदर्शित होताच...
न्यूज18 च्या रिपोर्ट्सनुसार, 'पॅरानॉर्मल अॅक्टिविटी' फ्रेंचायजीच्या या 7 चित्रपटांनी जगभरात सगळ्यांना वेड लावलं. इतकंच नाही तर या फ्रेंचायजी 890 मिलिय डॉलर म्हणजेच 7320 कोटींची कमाई केली.