Mohanlal Movie Thudarum Craze: जर तुम्हाला देखील चित्रपटांची प्रचंड आवड असेल तर तुम्ही मोहनलाल यांचं नाव नक्कीच ऐकलं असेल. मोहनलाल हे मल्याळम चित्रपट उद्योगातील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. सध्या सोशल मीडियावर मोहनलाल खूप चर्चेत आहेत. मार्च महिन्यात मोहनलाल यांच्या 'L2 एम्पुराण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत.
दरम्यान, अशातच आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'थुडरम' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रत्येकाला आवडली आहे. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मोहनलाल यांच्या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकांनी भरलेली बस दिसत आहे. 'थुडरम' चित्रपट पाहण्यासाठी लोक बसने येत असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपट पाहण्यासाठी मध्यरात्री प्रेक्षकांची गर्दी
सोशल मीडियवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मध्यरात्रीचा आहे. हा व्हिडिओ कन्नूरच्या प्रसिद्ध लिबर्टी थिएटरच्या बाहेरचा आहे. जिथे मध्यरात्री 12 वाजताच्या शोसाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना एबी जॉर्ज नावाच्या व्यक्तीने 'थुडरम' चित्रपटाबद्दल लोकांमध्ये असलेल्या क्रेझचा उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, संपूर्ण बस बुक करून 'थुडरम' चित्रपट पाहण्यासाठी आली आहे. तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता कन्नूरमधील लिबर्टी थिएटर बाहेरील व्हिडीओ आहे.
Crowds are coming to theatres by booking entire buses! Kannur Liberty 3rd day 12 am show scenes for #Thudarum
Malayalees are rushing to theatres to celebrate their favourite man's comeback in full glory...
Elders are coming to see their son...
Youths are coming to see… pic.twitter.com/cw68VPtdq7— AB George (@AbGeorge_) April 28, 2025
मल्याळम लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्याचबरोबर वृद्ध लोक देखील त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी येत आहेत. तरुण लोक त्यांच्या मोठ्या भावाला भेटायला येत आहेत. मुले त्यांच्या सुपरमॅनला भेटायला येत आहेत. 28 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'थुडरम' या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांमध्ये 31.35 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रत्येक वर्गातील लोकांना आवडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मल्याळम चित्रपट उद्योगाची स्थिती फारशी चांगली नव्हती. परंतु सध्या परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे.