प्लेनमध्ये ही 6 भागाची सीरीज पाहण्याची चूक करू नका; अन्यथा पाहताक्षणी प्लेनमध्ये बसायला घाबराल!

जर तुम्हाला देखील प्रवासामध्ये चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुम्ही ही 6 भागांची सीरीज पाहू शकता.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 14, 2025, 01:50 PM IST
प्लेनमध्ये ही 6 भागाची सीरीज पाहण्याची चूक करू नका; अन्यथा पाहताक्षणी प्लेनमध्ये बसायला घाबराल!

जर तुम्हाला चित्रपट पाहायला खूप आवडत असेल आणि प्रवासादरम्यान वेळ घालवण्यासाठी तुम्ही नेहमीच चित्रपटांचा आधार घेत असाल तर हा सल्ला नक्की लक्षात ठेवा. अनेकजण विमान प्रवासाच्या वेळी नेटफ्लिक्सवरील चित्रपट पाहतात. पण विमानात बसल्या-बसल्या 'फाइनल डेस्टिनेशन' ही सहा भागांची सीरीज पाहण्याची चूक मात्र कधीही करू नका. 

Add Zee News as a Preferred Source

कारण ही सीरीज सुरू केल्यानंतर प्रवासात तुम्ही इतके घाबरू शकता की संपूर्ण विमान प्रवासात तुमची अवस्था विचित्र होऊ शकते. ही सीरीज भूत-प्रेतांवर नाही तर मृत्यू आणि मृत्यूच्या अनिवार भीतीभोवती फिरते. म्हणूनच तिचा प्रभाव सामान्य हॉरर चित्रपटांपेक्षा जास्त तीव्र जाणवतो.

'फाइनल डेस्टिनेशन' मृत्यूच्या खेळाची मालिकाच!

या सीरीजचे आतापर्यंत सहा पार्ट आले आहेत. पहिला भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सहावा भाग Final Destination: Bloodlines यावर्षी 2025 मध्ये रिलीज झाला आहे. ही सर्व सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. प्रत्येक भाग साधारण दीड ते दोन तासांचा असल्याने वीकेंडला संपूर्ण सीरीज एका दिवसात पाहता येते.

फाइनल डेस्टिनेशन – भाग 1 (2000)

कथेची सुरुवात होते एका विद्यार्थ्याच्या भयानक भविष्यवाणीपासून. तो प्लेन क्रॅश होईल असे सांगतो. त्याच्या इशाऱ्यानंतर काही लोक विमानातून उतरतात आणि मृत्यूच्या तावडीतून वाचतात. पण प्रवासानंतर ‘मौत’ एकेक करून त्यांच्यावर परत येते आणि सगळे वेगवेगळ्या अपघातात मृत्युमुखी पडतात.

फाइनल डेस्टिनेशन – भाग 2 (2003)

यात एका मुलीला भीषण हायवे अॅक्सिडेंटची झलक दिसते. ती अनेक लोकांचे प्राण वाचवते पण बचावलेल्या सगळ्यांचा मृत्यू पुन्हा रहस्यमय पद्धतीने होऊ लागतो.

फाइनल डेस्टिनेशन – भाग 3 (2006)

या भागात कहाणी सुरू होते एका रोलर कोस्टर दुर्घटनेने. काही जण त्या अपघातातून वाचतात पण नंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या अविश्वसनीय अपघातात मृत्युमुखी पडतो.

फाइनल डेस्टिनेशन – भाग 4 (2009)

चौथा भाग एका रेसिंग ट्रॅकवरील प्रचंड भीषण अपघातावर आधारित आहे. आधीच साक्षात्कार झाल्यामुळे काही जण वाचतात पण नंतर मृत्यू त्यांना अजून क्रूर आणि भयावह पद्धतीने गाठतो.

फाइनल डेस्टिनेशन – भाग  5 (2011)

हा सर्वात मोठा ट्विस्ट असलेला भाग मानला जातो. यात एक मोठा पूल कोसळण्याचा प्रसंग दाखवला आहे. कथा जसजशी पुढे जाते, शेवटच्या टप्प्यावर येऊन अचानक कळते की हा भाग पहिल्या चित्रपटाशी थेट जोडलेला आहे.

फाइनल डेस्टिनेशन – भाग 6 (2025)

यावर्षी 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या भागात मृत्यूचा खेळ आणखी भयानक पद्धतीने दाखवला आहे. Bloodlines मध्ये मृत्यूची भीती, तिची उपस्थिती आणि तिचे नियम खूपच वेगळ्या, गूढ आणि हॉरर वाइब निर्माण करणाऱ्या शैलीत मांडले आहेत.

या सीरीजमध्ये कोणताही भूत-प्रेतांचा अँगल नाही पण मृत्यूची जाणीव, अपघातांची पद्धत आणि अचानक येणारे टेन्शन इतके प्रखर असते की विमानाच्या बंदिस्त वातावरणात तुमची अवस्था खराब होऊ शकते.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More