Video: प्रिया मराठेविषयी बोलताना अभिजित खांडकेकरचा कंठ दाटला; अर्ध्यावरच थांबला... सारे क्षणात नि:शब्द!

Priya Marathe : हिंदी आणि मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेला झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 12, 2025, 10:23 AM IST
Video: प्रिया मराठेविषयी बोलताना अभिजित खांडकेकरचा कंठ दाटला; अर्ध्यावरच थांबला... सारे क्षणात नि:शब्द!

Priya Marathe : प्रसिद्ध मराठी आणि हिंदी मालिका अभिनेत्री प्रिया मराठेचे 31 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगामुळे मुंबईतील तिच्या राहत्या घरी निधन झाले. ती गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. तिच्या निधनाने चाहत्यांमध्ये आणि सहकलाकारांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. तिच्या जीवनातील योगदान आणि अभिनयकौशल्याला आदरांजली देण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर आणि विविध कार्यक्रमांतून श्रद्धांजली वाहिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

 अशातच ‘झी मराठी अवॉर्ड 2025’ या सोहळ्यात मराठी अभिनेत्री प्रिया मराठेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या भावनिक प्रसंगी अभिनेत्रीचा सहकलाकार अभिजीत खांडकेकरला अश्रू अनावर झाले. या सोहळ्यात प्रिया मराठेच्या योगदानाची आठवण करून देताना तिच्या व्यक्तिमत्वाची आणि अभिनयकौशल्याची स्तुती करण्यात आली. अभिजीत खांडकेकरला प्रियेच्या आठवणींवर बोलताना भावनिक क्षणांना सामोरे जावे लागले. ज्यामुळे सोहळ्यातील उपस्थितांचेही डोळे भरून आले. यावेळी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत प्रिया मराठेला आदरांजली वाहिली. 

सोशल मीडियावर श्रद्धांजली 

प्रिया मराठेच्या निधनानंतर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. या पोस्ट्समध्ये प्रियाची ‘पवित्र रिश्ता’ मधील भूमिका, तिचे लढवय्या स्वभाव आणि कलाकार म्हणून केलेले योगदान यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेकजण तिच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रिया मराठेचा आदर व्यक्त केला आहे.

प्रिया मराठेने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये तसेच रंगभूमीवरील नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने विशेष स्थान मिळवले. तिच्या अभिनयाची दखल घेत अनेकजण तिच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा देत आहेत. प्रिया मराठेचे काम तिच्या चाहत्यांच्या मनात कायमच जिवंत राहील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रिया मराठेचे निधन मनोरंजनसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. तिच्या योगदानाला आदरांजली देत चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट्स शेअर करून तिच्या आठवणी उजाळा दिला आहे. 'झी मराठी अवॉर्ड 2025'मध्ये तिला वाहण्यात आलेली श्रद्धांजली हे तिच्या कारकिर्दीचा आणि व्यक्तिमत्वाचा एक गौरवमय आदर आहे.

FAQ

प्रिया मराठे यांचे निधन कधी आणि कसे झाले?

प्रिया मराठे यांचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी मुंबईतील तिच्या राहत्या घरी कर्करोगामुळे निधन झाले. त्या गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराशी झुंज देत होत्या.

‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ सोहळ्यात श्रद्धांजली कशी वाहिली?

सोहळ्यात सूत्रसंचालक अभिनेता अभिजीत खांडकेकर यांचा कंठ दाटून आला. उपस्थित कलाकारांनी उभे राहून प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

झी मराठीने सोशल मीडियावर काय शेअर केले?

झी मराठीने प्रियाच्या योगदान, अभिनयकौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचे गुण स्मरण करणारी पोस्ट शेअर केली, ज्याने चाहत्यांना भावुक केले.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More