फोटोग्राफर समोर जॅकेट ओपन करत अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट

'उत्तरन' फेम अभिनेत्री टीना दत्ता आजकाल तिच्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

Updated: Oct 23, 2021, 11:38 AM IST
 फोटोग्राफर समोर जॅकेट ओपन करत अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट

मुंबई : 'उत्तरन' फेम अभिनेत्री टीना दत्ता आजकाल तिच्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टीना दत्ताने सोशल मीडियावर एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अशा परिस्थितीत, 'संस्कारी बहू'ची प्रतिमा असणाऱ्या टीना दत्ताने अलीकडेच टॉपलेस फोटोशूट केले, त्यानंतर बराच गोंधळ उडाला.

अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे, ज्यामध्ये ती खूप वेगळ्या अंदाजात दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीना दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोतील तिचा बोल्ड लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोत, टीनाने राखाडी रंगाचे लॉन्ग जॅकेट घातले आहे आणि ते ओपन ठेवलं आहे. टीना दत्ताने या जॅकेटसोबत काळ्या रंगाची शॉर्ट्स आणि हाय हील्स घातल्या आहेत, सोबत तिने सनग्लासेसही घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

साहजिकच, टीनाचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत, हे पाहून तिच्या चाहत्यांनी या फोटोला खूप कमेंट आणि लाईक्स दिले आहेत. फोटोसोबतच टीनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'सेक्सी असणे हे केवळ वृत्तीत आहे आणि तुम्ही परिधान केलेले कपडे नाहीत, तुमची वृत्ती तुमची विनयशीलता ठरवते आणि तुम्ही परिधान केलेले कपडे नाही.'