एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास; 'माझी प्रारतना' चित्रपट 'या' दिवशी येणार भेटीला

Marathi Movie : एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, 'माझी प्रारतना' या नव्या मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित.

दिक्षा पाटील | Updated: Mar 7, 2025, 08:31 PM IST
एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास; 'माझी प्रारतना' चित्रपट 'या' दिवशी येणार भेटीला
(Photo Credit : PR Handover)

Marathi Movie : प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही, वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा', लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे. जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.

Add Zee News as a Preferred Source

ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे. जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की, तुम्हाला कळणार नाही अशी तुमच्या मनाला वादळासारखी आदळेल. तुम्हाला स्तब्ध आणि भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते आणि हा मन हेलावून टाकणारा प्रवास तुम्हाला दाखवेल की प्रेम हीच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे.

'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा' 9 मे 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे, तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे.

हेही वाचा : सिंगल स्क्रीन ते मल्टीप्लेक्स, सगळीकडे दर एकच; 200 रुपयांमध्ये मिळणार तिकिट; 'या' राज्यात सरकारचा मोठा निर्णय

चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात असली तरी लवकरच टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्कंठेनं उच्चांक गाठला आहे आणि 'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. तर हा पोस्टर पाहून नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, तर 'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेम कथा' 9 मे 2025 ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

About the Author