Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत!

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Updated: Feb 4, 2023, 08:29 PM IST
Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत! title=
Mahesh Manjrekar,Namrata Shirodkar

Valentine's Week 2023:  प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला कारण ठरतंय त्याची वेब सिरीज 'काळे धंदे'. या वेब सिरीजमध्ये (kale dhande) बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे लहुजी शक्ती सेनेकडून धरणे आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता मांजरेकर (Mahesh Manjrekar controversy) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. (Valentine Week 2023 Mahesh Manjrekar Namrata Shirodkar love story marathi news)

हुशार त्याचबरोबर अनुभवी अभिनेता-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखण्यात येतं. मांजरेकरांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत अनेकांना माहिती आहे. परंतू, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.  महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?  असा सवाल सर्वांनाच पडला असेल.

आणखी वाचा  - 'वीर सावरकर' Biopic चं दिग्दर्शन करण्यास महेश मांजरेकर यांचा नकार! कारण...

महेश मांजरेकर जिच्या प्रेमात होते ती, अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) आहे. होय तिच नम्रता, जी वास्तवमध्ये संजय दत्तसह (Sanjay Dutt) दिसली होती. नम्रता शिरोडकर आणि महेश मांजरेकर पहिल्यांदा वास्तवच्या सेटवर भेटले. त्यावेळी त्यांच्यातील मैत्री वाढत गेली. याच काळात त्यांच्यातील नात्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी मांजरेकरांचं लग्न देखील झालं होतं.

दरम्यान, कोणा एका वादामुळे दोघांचं नात जास्तवेळ टिकलं नाही, अशी चर्चा असते. काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप देखील झाला. नम्रता शिरोडकरने त्यानंतर साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत (Mahesh Babu) लग्न केलं. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) 1995 मध्ये ‘आई’ हा सिनेमा दिग्दर्शित करत होते, त्यावेळी (mahesh manjrekar wife) मेधा मांजरेकर यांच्याशी त्यांचं नातं जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.