'वय काय, वागते काय?'मायरा वायकुळबद्दल लोकं 'हे' काय बोलून गेले...

Myra Vaikul Interview: मराठमोळी बालकलाकार मायरा वायकुळ तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. याला कारण आहे तिच्या मुलाखतीतील एक क्लिप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे तिच्यावर टीका होत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 8, 2025, 12:18 PM IST
'वय काय, वागते काय?'मायरा वायकुळबद्दल लोकं 'हे' काय बोलून गेले...
myra vaikul crying

Myra Vaikul Interview:  मालिका आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेली बालकलाकार मायरा वायकुळ. कमी वयात मायरा प्रसिद्धीच्या झोकात आली. मायराने मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. या निमित्ताने ती सोशल मीडियावर ऍक्टिव असते. नुकतीच तिची मुलाखत घेतली गेली. या मुलाखतीतील काही क्लिप्स व्हायरल होत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

यामध्ये मायरा वायकुळ आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलींसारख वागत आहे. तिचं बोलणं अगदी मोठ्यांसारखं झालं असून तिचं बालपण हरवल्याचं दिसत आहे. या मुलाखतीत मायरा तिच्या मैत्रिणीबद्दल सांगत आहे. पण ती जे काही सांगत आहे त्यामुळे ती ट्रोल झाली आहे. 

काय म्हणाली मायरा?

“माझी एक मैत्रीण होती, जी ग्रेड वनपासून माझ्यासोबत होती. तिची वागणूक खूप बदलली. ती माझ्याशी खूप वाईट वागते. मी तिच्याशी अजून तशी नाही वागत. डॅडी मला असंच सांगत आले की, ती जर तुझ्याशी अशी वागत असेल आणि तू पण तिच्यासारखीच वागलीस, तर तुझ्यात आणि तिच्यात काय फरक राहणार”, असं मायरा या मुलाखतीत सांगते. 

या मुलाखतीवरुन मायराला खूप ट्रोल केलं जात आहे. मायराच्या या व्हिडीओवर अनेक व्हिडीओ देखील तयार झाले आहेत. तसेच या खाली आलेल्या कमेंटमध्ये मायराची चिंता व्यक्त केली जात आहे. 

मायराला ट्रोल केलं जात असून त्याखाली कमेंट केल्या आहेत. वेळेच्या आधी आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रसिद्धी किंवा यश मिळालं की हे असं होतं.  ‘घरूनच वाचून निघते वाटतं स्क्रिप्ट’. तसेच ‘ही मुलगी डोक्यातच जाते. वय काय आणि वागते काय? आमच्या आईवडिलांना आम्हाला हाणून काढलं असतं अशा चर्चा केल्या तर’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

करत असेल अ‍ॅक्टिंग चांगली पण जन्माला आल्यापासूनच रील्स आणि मग अ‍ॅक्टिंग यात या पोरीचं बालपण प्रौढ झालं. ती कधीच बालिश बोलत नाही. खूपच अति मॅच्युअर मुलीप्रमाणे वागत असते. जे तिच्या वयाला बिलकुल चांगलं नाही. पण हिच्या पालकांना हे कळत नाहीह. तिच्या भविष्यासाठी हे चांगलं नाही,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

पाहा संपूर्ण मुलाखत

नेमकं काय चुकतंय? 

मायरा वायकुळला पालकांनी सगळ्या गोष्टींशी जोडलं आहे. मुलाखत, अभिनय यासोबतच ती सोशल मीडियावर ऍक्टिव आहे. मायरा तिचं बालपण विसरत चालली आहे. तिने तिचं बालपण जगायला हवं. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More