अत्यंत भावनिक क्षण! प्रियाबद्दल बोलताना अभिजितला अश्रू अनावर, सर्वांच्या डोळ्यांत पाणी पाहा व्हिडीओ

Zee Marathi Awards 2025: कलाकारांनी प्रिया मराठेला आदरांजली अर्पण केली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Intern | Updated: Oct 12, 2025, 05:18 PM IST
अत्यंत भावनिक क्षण! प्रियाबद्दल बोलताना अभिजितला अश्रू अनावर, सर्वांच्या डोळ्यांत पाणी पाहा व्हिडीओ

टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 August 2025 रोजी निधन झालं. अभिनेत्री कॅन्सरशी झुंजत होती, पण तिची ही झुंज अपयशी ठरली. प्रिया अनेक वर्षांपासून मालिकाविश्वात काम करत होती आणि तिनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आपला अभिनय सादर केला. तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयात ती घर करून बसली होती. प्रियाच्या अकाली जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या निधनानंतर अनेक मित्र आणि सहकर्मी सोशल मीडियावर तिच्या आठवणी शेअर करताना भावूक झाले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात प्रिया मराठेला आदरांजली अर्पण करण्यात आली. पुरस्कार सोहळ्यादरम्यान उपस्थित कलाकारांचा भावनिक सहभाग पाहायला मिळाला. सगळ्यांचे डोळे पाणावलेले दिसून आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

प्रिया मराठेला वाहिली आदरांजली

'झी मराठी'च्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अभिजित खांडकेकर म्हणतोय, 'आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे. सगळी स्वप्न सजतायतेत रंगातायत. पुरस्कार जाहीर होतायेत. याच निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली. मग ती नायिका असो किंवा खलनायिका...' प्रियाबद्दल बोलताना अभिजितचे अश्रू अनावर झाले, आणि त्यांची भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. पुढे मृण्मयी देशपांडे म्हणते, 'या सुखांनो या मालिकेतून झी मराठीवर पदार्पण केलं. त्यानंतर तू तिथे मी मधील प्रिया मोहिते या खलनायिकेची छाप पाडली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील गोदावरी प्रेक्षकांना भावली. येऊ कशी कशी मी नांदायला मधील बॉसही ओमकार स्विटूच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. पड्यावरच्या भूमिका रंगवत ती खऱ्या आयुष्यातली जवळची मैत्रीण झाली, आदर्श मुलगी आणि सदैव साथ देणारी बायको सुद्धा झाली. मी एवढंच सांगेन, प्रिया आजही आपल्या स्मृतीत आहे. तिच्या कलाकृतींमध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे.' यानंतर पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांनी प्रिया मराठेला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी उपस्थित कलाकार, मित्र आणि सहकर्मी भावनिक झाले.

प्रिया आणि अभिजितची खास मैत्री

प्रिया मराठे आणि अभिजित खांडकेकर यांचं नातं खूप खास होतं. त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या काळात त्यांची नाती इतकी घट्ट झाली की, आजही त्यांचे आठवणींना प्रेक्षक भावनिक आहेत. प्रियाच्या निधनानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आणि सहकर्म्यांमध्ये मोठा शोक आहे. झी मराठी अवॉर्ड्समध्ये कलाकारांनी दिलेली श्रद्धांजली तिच्या कलात्मक योगदानाची खरी आठवण जपणारी ठरली आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना भावनिक करून टाकतो आणि प्रिया मराठे आपल्या स्मृतीत सदैव जिवंत राहणार असल्याचे स्पष्ट करतो.

FAQ
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात प्रिया मराठेला कशाप्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली?
सर्व उपस्थित कलाकारांनी प्रिया मराठेला मानाचा सलाम करत आदरांजली अर्पण केली. व्हिडीओमध्ये अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्यासह अनेक कलाकार भावनिक झालेले दिसतात.

प्रिया मराठे आणि अभिजित खांडकेकर यांचं नातं कसं होतं?
दोघांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत एकत्र काम केलं आणि त्यांची मैत्री खूप खास होती. पुरस्कार सोहळ्यातही अभिजित भावनिक झाले आणि प्रिया बद्दल त्याच्या अश्रू अनावर झाले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ का व्हायरल होत आहे?
व्हिडीओत कलाकारांची भावूक प्रतिक्रिया, प्रिया मराठेच्या आठवणी आणि सर्वांच्या डोळ्यांत पाणी आलेले दृश्य असल्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये तो व्हायरल झाला आहे.

About the Author