मुंबई : 'थलैवा', 'सुपरस्टार' अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांचा नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कलाविश्वातील रजनीकांत यांच्या योगदानानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला मिळालेला हा मानाचा पुरस्कार त्यांनी सुखदु:खाचे सोबती असणाऱ्या खास मित्र राज बहादुर यांना समर्पित केला. 


मित्राची आठवण काढत रजनीकांत यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते पाहता टाळ्यांचा कडकडाट झाला. 


राज बहादुर ही तिच व्यक्ती ज्यानं रजनाकांत यांच्यातील अभिनय कौशल्य हेरत त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्याचा सल्ला दिला होता. राज बहादुर हे कर्नाटकात बस चालक आहेत.


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट... 
बऱ्याच वर्षांपूर्वी, अभिनयात येण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते. अभिनेता व्हायचं स्वप्न त्यांन दूरदूरपर्यंत पाहिलं नव्हतं. पण, त्यांच्या या मित्राची नजर मात्र पारखी होती. 


रजनीकांत यांना त्यांनी अभिनय विश्वात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनीही हा सल्ला ऐकला आणि पाहता पाहता यशाच्या परमोच्च शिखरावर पोहोचले. 


लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि जाऊ तिथे यशाचा आनंद लुटणाऱ्या रजनीकांत यांनी कधीही त्यांच्या या मित्राला विसरण्याचं धाडस केल नाही. 


जवळपास 50 वर्षांहूनही अधिक वर्षांची त्यांची ही मैत्री. शिवाजीराव गायकवाड यांना सुपरस्टार रजनीकांत बनवण्यामध्ये राज बहादुर यांचा मोठा वाटा. 


ज्यावेळी रजनीकांत यांना बहादुर यांनी अभिनय शाळेत चैन्नईला पाठवलं होतं तेव्हा त्यांनी आपला अर्धा पगार म्हणजेच, 200 रुपये दिले होते. रजनीकांत यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज बहादुर त्यांना अर्धा पगार देत होते. 


रजनीकांत यांना भेटण्याची जेव्हा जेव्हा इच्छा होते, तेव्हा तेव्हा राज त्यांच्या घरी जातात. किंबहुना राज यांच्यासाठी रजनीकांत यांच्या घरात एक खोली खास राखीवही ठेवण्यात आली आहे.