Vani Jairam: मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यावर्षी आपल्या संगीतक्षेत्रातील कारकार्दसाठी पद्मभुषण पुरस्कार पटकावलेल्या दाक्षिणात्त्य पार्श्वगायिका वाणी जयराम यांनी राहत्या घरी निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्या 77 वयाच्या होत्या. त्यांच्या मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला आहे याबाबत अद्यापही काही माहिती नाही. त्यांच्या निधनानं संगीतक्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला आहे. 


कोण होत्या वाणी जयराम? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी त्यांच्या कारकीर्दमध्ये अनेक गाणी गायली आहेत. त्यांचा आत्तापर्यंत 10 हजार गाणी गायली आहेत. त्यांना आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना त्यांनी गायलेल्या अन्य प्रादेशिक भाषांसाठीही अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांनी नुकतेच त्याच्या करिअरची 50 वर्षेही पुर्ण केली होती. त्यांना यावर्षी पद्मभुषण हा नामांकित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आर. डी. बर्मन यांच्यासोबतही काम केले होते. त्यांच्या गायिकेची ओळख ही सुंपुर्ण भारतात होती. त्याचबरोबर त्यांच्या गाण्याची ख्याती ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही होती. 


नेमकं काय घडलं? 


समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की काही दिवसांपुर्वी गायिका वाणी जयराम यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे असं सांगितले जाते आहे की, त्यांचा मृत्यू हा त्यांना डोक्याला लागलेल्या या जखमेमुळे झाला असावा. वाणी जयराम या दाक्षिणात्त्य संगीतक्षेत्रातील खूप मोठ्या गायिका होत्या. तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम, बंगाली, तुलू आणि उडिया सारख्या सर्व भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्याशिवाय हिंदी, मराठी, भोजपूरी, उर्दू अशा भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली आहेत. 


 वाणी जयराम यांनी 1971 सालपासून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यांचा जन्म हा कलायवानी, वैल्लोर, तामिळनाडू येथे झाला. त्यांना शास्त्रीय संगीतातून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी वयाच्या 8 व्या वर्षापासून गायनाला सुरूवात केली आहे. त्यांनी मराठीतूनही गाणी गायली आहेत. त्यातून सर्वात लोकप्रिय गाणं ऋणानुबंधाच्या... ज्येष्ठ गायक कुमार गंधर्व यांच्यासोबत गायले आहे. सध्या त्यांच्या निधनानं सगळ्या संगीतसृष्टीला धक्का बसला आहे.



त्यांनी अनेक वर्षे मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत कामं केली आहेत. त्यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार केले जातील.