'Little Kaushal'ने उडवली कतरिनाची झोप अन्... पोस्ट शेअर करत विक्की असं का म्हणाला?

कतरिना कैफ आणि विकी कौशल आज, 9 डिसेंबर रोजी त्यांची anniversary साजरी करत आहेत. या प्रसंगी विकी कौशलने एक गोंडस सेल्फी शेअर केली आणि कतरिनाला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. आई झाल्यानंतर कतरिनाचा पहिला फोटो पहाच.  

Updated: Dec 10, 2025, 02:25 PM IST
'Little Kaushal'ने उडवली कतरिनाची झोप अन्... पोस्ट शेअर करत विक्की असं का म्हणाला?
Photo credits - Social Media

कतरिना कैफ आणि विकी कौशल आज, 9 डिसेंबर रोजी त्यांची चौथी Wedding anniversary साजरी करत आहेत. चाहते सकाळपासूनच त्यांच्या पोस्टची वाट पाहत होते. याचे एक कारण म्हणजे पालक झाल्यानंतर कतरिना आणि विकी यांचे हे पहिले सेलिब्रेशन आहे. त्यामुळे चाहते त्यांच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते. या खास प्रसंगी, विकी कौशलने कतरिनासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आणि त्याचे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केले. भव्य उत्सवाऐवजी, या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील हा खास दिवस बाळासोबत शांतपणे साजरा करण्याचा पर्याय निवडला आहे असे वाटते. 

Add Zee News as a Preferred Source

मुलाने उडवली विक्की कतरिनाची झोप
अलीकडे अभिनेता विक्कने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, आई झाल्यानंतर कतरिनाची झोप उडाली आहे. त्यानंतर विकी कौशलने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.   सेल्फीमध्ये कतरिना त्याचा पती विकीच्या मिठीत दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना विकीने कतरिनाबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या. त्याने कतरिना कैफवर प्रेमाचा वर्षाव करत,  कॅप्शनमध्ये एक गोड नोट लिहिली: "आज साजरा करत आहोत... खूप आनंदी, कृतज्ञ आणि झोप पूर्ण न झालेल्या लग्नाच्या 4 वर्षांच्या शुभेच्छा."

चाहत्यांच्या सेल्फीवर एकाहून एक प्रतिक्रिया
विकी कौशलने हे पोस्ट करताच, त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. नेहा धुपियापासून ते झोया अख्तरपर्यंत सर्वांनी विकीच्या पोस्टवर इमोजीज पाठवत शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला. एका चाहत्याने लिहिले, "खूप सुंदर, कोणाची वाईट नजर लागु नये." दुसऱ्याने लिहिले, "आई-बाबांच्या चेहऱ्यावर चमक स्पष्ट दिसत आहे." अनेकांनी म्हटले की या फोटोत कतरिना थकलेली दिसतेय.

विकी-कतरिनाचे लग्न
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2025  रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे लग्न केले. हा एक अतिशय खाजगी आणि राजसी विवाह होता ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या तीन वर्षांहून अधिक काळानंतर, या जोडप्याने त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि नंतर 7  नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी चिमुकल्याचे स्वगत केले.

About the Author