मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफने डिसेंबर महिन्यात लग्न केलं. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खास लोकांच्या उपस्थितीत शाही विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेकांनी त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान लग्नाच्या तीन महिन्यांनंतर विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून विकीचं नवं रूप आणि त्याचं कलेवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. विकीने  73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शास्त्रीय संगीतावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by One Song (@onesongmagazine)


व्हिडीओमध्ये विकी 'ये वतन वतन मेरे...' गाण्यावर विणा वाजवताना दिसत आहे. विकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विकीचा हा अंदाज अनेकांना आवडला, तर काहींनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. 


एक युजर विकीला म्हणाला, 'तू जे वाजवल आहेस ते बरोबर नाही, पण सुंदर आहे...' तर दुसरा युजर म्हणाला,  'सांगितलं होतं लग्न करू नकोस.. झालास ना देवदास.... ' असं म्हणाला आहे.