बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना. दोघांचा मोठा चाहतावर्ग असून, त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच नवनवीन अफवा पसरत असतात. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकाच वेळी अंगठी फ्लॉन्ट केल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. मात्र, या दोघांनीही याबद्दल स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढली होती.
आता मात्र त्यांच्या लग्नाबद्दलचा नवा अपडेट समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, विजय आणि रश्मिका पुढील वर्षी 26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा हा भव्य विवाहसोहळा उदयपूरमधील एका ग्रँड पॅलेसमध्ये पार पडेल, असं म्हटलं जात आहे. या बातमीने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिकाने 3 ऑक्टोबर रोजी गुपचूप साखरपुडा केल्याचं सांगितलं जातं. या समारंभाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या साखरपुड्यानंतर दोघांनी सार्वजनिकरित्या काहीच भाष्य केलं नव्हतं. मात्र काही दिवसांपूर्वी एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान पत्रकारांनी रश्मिकाला याबद्दल विचारलं असता ती हसत म्हणाली, 'सगळ्यांना माहितच आहे ना!' तिच्या या उत्तरामुळे चाहत्यांच्या संशयाला आणखी पुष्टी मिळाली.
तसंच एका मीट अँड ग्रीट कार्यक्रमात चाहत्याने तिला विचारलं, 'तू विजयशी लग्न करशील का?' तेव्हा रश्मिकाने न लपवता उत्तर दिलं, 'हो, मी विजयशीच लग्न करेन!' तिचं हे उत्तर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. रश्मिका आणि विजयची लव्हस्टोरी ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली होती. दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना तेव्हाच भावली होती. त्यानंतरही त्यांनी एकत्र अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली आणि त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिकच जोर आला.
याआधी रश्मिकाचा 2017 साली अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता, मात्र एका वर्षातच त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत राहिली. आज ती साऊथ आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाच्या या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. मात्र, दोघांकडूनही अद्याप कोणतंही अधिकृत कन्फर्मेशन आलं नाही. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाच्या औपचारिक घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
FAQ
विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना कधी लग्न करणार आहेत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, विजय आणि रश्मिका पुढील वर्षी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, दोघांकडून अद्याप अधिकृत पुष्टी आलेली नाही.
विजय आणि रश्मिकाने साखरपुडा केव्हा केला?
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या दोघांनी 3 ऑक्टोबर 2025 रोजी गुपचूप साखरपुडा केला होता. हा समारंभ केवळ कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.
रश्मिकाने साखरपुड्याच्या चर्चांवर काय प्रतिक्रिया दिली?
एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान रश्मिकाला विचारले असता ती हसून म्हणाली, “सगळ्यांना माहितच आहे ना!” तसेच एका चाहत्याच्या प्रश्नावर तिने स्पष्ट सांगितले, “मी विजयशीच लग्न करेन!”
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.