Vidyut Jammwal Viral Video: बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल आता इंटरनॅशनल स्टार झाला आहे. या वर्षी त्याचा 'स्ट्रीट फायटर' चित्रपट येणार आहे. विद्युत जामवाल फक्त चित्रपटांमध्ये स्टंट करताना दिसत नाही, तर खऱ्या आयुष्यातही असे अनेक स्टंट लाईव्ह करतो. कधी तर आपल्या डोळ्यांवर गरम मेण टाकतो तर कधी चाढावर चढतो. पण आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो बिनधास्त झाडावर चढताना दिसत आहे. आता यात आश्चर्य काय असं तुम्हाला वाटत असेल. तर यात तो नग्न आहे. त्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.
विद्युत जामवालने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो डान्स करताना आणि डोळ्यांवर गरम मेण टाकताना दिसला होता. दरम्यान विद्युतने आता आपल्या कपड्यांचा त्याग केला आहे. इंस्टाग्रामवर त्याने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओत तो कपड्यांचा त्याग करताना दिसत आहे. व्हिडीओत विद्युतचा अंगावर एकही कपडा दिसत नाही आहे.
व्हिडीओत विद्युत जामवाल झाडावर चढताना, उतरताना तसंच भाल्यांवर बॅलेन्स करताना, बर्फात तपस्या करताना, डोळ्यांवर मेण टाकताना दिसत आहे. हा सर्व त्याच्या कलारीपयट्टू कलेचा भाग आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिलं आहे की, "एक कलारीपयट्टू अभ्यासक म्हणून, मी दरवर्षी 'सहज' या योगिक साधनेत स्वतःला मग्न करतो. सहज म्हणजे नैसर्गिक साधेपणा आणि सहजतेच्या स्थितीत परत येणे, ज्यामुळे निसर्गाशी आणि आंतरिक जागरूकतेशी खोलवर संबंध येतो. वैज्ञानिकदृष्ट्या, ही पद्धत अनेक न्यूरोरिसेप्टर्स आणि प्रोप्रिओसेप्टर्सना सक्रिय करते, संवेदी अभिप्राय वाढवते आणि संतुलन आणि समन्वय सुधारते. यामुळे शरीराची सखोल जाणीव, मानसिक एकाग्रता वाढते आणि खोलवर स्थैर्य येते."
विद्युत जामवाल मन एकाग्र करण्याच्या हेतूने भलेही नग्न अवस्थेत झाडावर चढला असेल, परंतु त्याच्या कृतीमुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे. अनेक युजर्स स्तब्ध झाले आहेत, तर काहीजण अभिनेत्यावर टीका करत आहेत. एका युजरने कमेंट केली, "सर, तुम्ही निसर्गात इतके खोलवर जाऊ नये." दुसऱ्याने लिहिले, "टार्झननेही पाने घातली होती, पण सर, तुम्ही महान आहात." तिसऱ्याने कमेंट केली, "तो खरोखर मानवी जीवन जगणारा आहे." दुसऱ्याने लिहिले, "भाऊ, नग्न होण्याचा काय अर्थ होता?"
विद्युत जामवाल गेल्या अनेक वर्षांपासून कलारीपयट्टूचा सराव करत आहे. तो निसर्गाशी जोडण्यासाठी अनेकदा असं काही करत असतो. यापूर्वी, डिसेंबर 2023 मध्ये, अभिनेत्याने स्वतःचे नग्न फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये त्याने हिमालयीन पर्वतरांगांमध्ये स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचे वर्णन केले होते. येथे, विद्युत थंड नदीत नग्न उभा राहून तपस्या करताना दिसला.
प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर, विद्युत जामवाल त्याच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. तो "स्ट्रीट फायटर" चित्रपटात दलसीम नावाच्या योगीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट "स्ट्रीट फायटर" या लोकप्रिय व्हिडिओ गेमचे लाईव्ह-अॅक्शन रूपांतर आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 ेरोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.