'मुलगा कुवेतमध्ये अडकला', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदार रडून रडून बेहाल

Vishakha Subhedar : मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रडून बेहाल झाली आहे. विशाखाचा मुलगा कुवैतमध्ये अडकल्याच म्हणत आहे. विशाखाने या व्हिडीओच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 3, 2026, 01:36 PM IST
'मुलगा कुवेतमध्ये अडकला', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदार रडून रडून बेहाल

Iran Israel War : इराण-इस्त्रालय यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही देशांमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. या परिस्थितीत अनेक महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकल्याच तिने एका व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अभिनय सुभेदार असं विशाखा सुभेदारच्या मुलाचं नाव आहे. अभिनय लंडनला उच्च शिक्षणासाठी जात होता. प्रवासादरम्यान कुवेतमध्ये विमानाचा 'ले-ओव्हर' (Layover) होता. मात्र, मध्य पूर्वेतील (इराण-इस्रायल संघर्ष) युद्धजन्य परिस्थितीमुळे एअरस्पेस बंद करण्यात आले आणि विमान उड्डाणे रद्द झाली. यामुळे तो गेल्या ४ दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे

अभिनय सध्या तेथील एका हॉटेलमध्ये असून एअरलाईन्स सर्व्हिसद्वारे त्याची सोय करण्यात आली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy) मदत केली आहे, तरीही तेथील परिस्थिती गंभीर होत असल्याने विशाखा यांनी चिंतेतून मदतीचे आवाहन केले आहे. मदतीसाठी आवाहन: विशाखा सुभेदार यांनी रडत एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात पंतप्रधान नरेन्द्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, ज्याप्रमाणे दुबईतील भारतीयांना परत आणले जात आहे, तसेच कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनयसह इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी. अभिनय लंडनच्या प्लायमाउथ (Plymouth) शहरात 'एम.ए. इन फिल्म मेकिंग'चे शिक्षण घेत आहे. विशाखाच्या या भावनिक पोस्टवर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना धीर दिला आहे. 

विशाखा सुभेदार काय म्हणाली?

 नमस्कार, मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र कुवेतमध्ये Lay Over असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. गेले चार दिवस एअर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहित आहे. विमान रद्द करण्यात आली आहे. माझा मुलगा चार  दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथी परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. तो स्वतः तिथे अनुभवतोय. तिथे हल्ले होत आहेत. एअरलाईनने आता त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. इंडियन अँबेसीने व्यवस्था केली आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More