महाराष्ट्राची ‘सबसे कातील’ म्हणून ओळख मिळवलेली लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आहे, मात्र यावेळी तिच्या डान्स व्हिडिओंमुळे नव्हे तर तिच्या नव्या गाण्यासह तिने केलेल्या एका अनपेक्षित कबुलीजबाबामुळे. गौतमीच्या चाहत्यांना थक्क करून सोडणारा हा खुलासा तिच्या व्यावसायिक आयुष्याचा एक महत्त्वाचा पैलू उघड करतो. नुकतंच गौतमी पाटील आणि गायक अभिजीत सावंत यांचं नवं गाणं ‘रुपेरी वाळूत’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं. ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेलं हे गाणं लॉन्च होताच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं. अलिबागच्या सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर, रुपेरी वाळूत शूट झालेल्या या गाण्याची दृश्यसौंदर्य, संगीताची लय आणि गौतमी–अभिजीतची केमिस्ट्री यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात झिरपलं आहे.
‘रुपेरी वाळूत’च्या प्रमोशनदरम्यान गौतमीने आपल्या करिअरबाबत अशी गोष्ट उघड केली की अनेकांना आश्चर्य वाटलं. डान्स क्षेत्रात अव्वल असलेल्या गौतमीला अभिनयाची भीती वाटते, हे तिने स्वतः मान्य केले. ती म्हणाली, 'अभिनय मला नको वाटतो. मला नृत्याची प्रचंड आवड आहे, पण अभिनय तितका आवडत नाही. ‘रुपेरी वाळूत’मध्ये अभिनय आहे हेच मला शूटिंगच्या आधी कळलं.' गौतमीने हेही सांगितलं की या गाण्यासाठी कोणतीही रिहर्सल नव्हती. 'आम्ही कोणतीही तालमी केल्या नव्हत्या. सर्व काही ऑन-द-स्पॉट ठरलं. टेकवर टेक घेत होते. पण अभिजीत आणि मी एकमेकांना सपोर्ट करत शूट पूर्ण केलं. अभिनयाची वेळ आली की मला नेहमीच दडपण जाणवतं,' असं ती म्हणाली.
गौतमीची लोकप्रियता जितकी मोठी, तितक्याच वेगाने तिच्यावर टीकाही होते. तिच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीका होते, तरीही तिच्या चाहत्यांचा मोठा समुदाय तिच्या पाठीशी उभा असतो. तिचा प्रत्येक लाइव्ह शो गजबजलेला असतो. डान्स पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते, आणि हीच तिची खरी ताकद आहे.
घरच्या परिस्थितीवरून बोलताना गौतमीने सांगितलं की तिने जीवनात अनेक कठीण प्रसंग पाहिले आणि नृत्य हेच तिचं आधारस्थान ठरलं. 'कला एखाद्याच्या अंगात नैसर्गिक असते. मी या क्षेत्रात आल्यावर हळूहळू सगळ्या अदा शिकलं. स्टेज हा माझ्यासाठी एक पवित्र स्थान आहे. तिथे गेल्यावर मी सर्व विसरून जाते,' असं ती भावूक होत म्हणाली.
तिच्या कार्यक्रमांना आता महिलांची प्रचंड उपस्थिती दिसायला लागली आहे. गौतमीच्या मते 'हा बदल मला खूप सकारात्मक वाटतो. माझ्या परफॉर्मन्समुळे महिलाही मोकळेपणाने, निर्धास्तपणे कार्यक्रमांना येतात, हे माझ्यासाठी मोठं यश आहे.'
गौतमीच्या या खुलासामुळे आता प्रेक्षक तिचं ‘रुपेरी वाळूत’मधील अभिनयाकडे अधिक बारकाईने पाहत आहेत. डान्समधील तिच्या सहजतेप्रमाणेच अभिनयातही ती स्वतःला सिद्ध करू शकते का, याविषयी आता चर्चा रंगू लागली आहे. असं म्हणायला हरकत नाही की डान्सच्या जोरावर घराघरात पोहोचलेली गौतमी पाटील आता अभिनय या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत असून, ‘भीती’ असूनही प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाच्या जोरावर ती पुढे काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘रुपेरी वाळूत’ हे गाणं कधी रिलीज झाले आणि कुठे शूट करण्यात आले?
‘रुपेरी वाळूत’ हे गाणं 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाले असून, याचे शूटिंग अलिबागच्या समुद्रकिनारी, रुपेरी वाळूत करण्यात आले आहे.
गौतमी पाटीलला अभिनयाची भीती का वाटते?
गौतमीच्या मते ती अभिनयात तितकी सहज नाही. नृत्य तिचं खरं क्षेत्र असल्यामुळे अभिनयाच्या वेळी तिला दडपण येतं. ‘रुपेरी वाळूत’मध्ये अभिनय करायचा आहे हेही तिला शूटिंगच्या आधीपर्यंत माहित नव्हतं.
गौतमी पाटीलचे स्टेज शो इतके लोकप्रिय का आहेत?
तिची कातील अदा, लयबद्ध डान्स स्टेप्स आणि प्रेक्षकांशी असलेला थेट संवाद यामुळे तिच्या शोला हजारोंचा जमाव असतो. तिचा मोठा सोशल मीडिया फॅनबेसही तिच्या लोकप्रियतेला सतत चालना देतो.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.