अक्षय खन्नाच्या एन्ट्री सीनमुळे 'ग्लोबल हीट' ठरलेल्या, FA9LA सिंगरची Net Worth किती?

धुरंधर’ चित्रपटाने रणवीर सिंगच्या दमदार अभिनय आणि अक्षय खन्नाच्या डेशिंग लूकमुळे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  सर्वाधिक आकर्षक बाब म्हणजे अक्षय खन्नाच्या एंट्रीचं गाणं आणि डान्स. तुम्हाला माहित आहे का ते गाणं कोणी गायलं? या गायकाची नेटवर्थ एखाद्या टॉपच्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही.

Updated: Dec 15, 2025, 05:09 PM IST
अक्षय खन्नाच्या एन्ट्री सीनमुळे 'ग्लोबल हीट' ठरलेल्या, FA9LA सिंगरची Net Worth किती?

अक्षय खन्नाच्या एंट्रीचं गाणं, FA9LA (फसला) हे असून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचा गायक बहरीनचा रॅपर हुसम असीम आहे. हुसनला त्याचे चाहते फ्लिपैराची असेही म्हणतात. बहरीन-मोरक्कन पार्श्वभूमीतून आलेला हुसम हा खलीज हिप-हॉपमधील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. तो आधुनिक बीट्ससह अरबी संगीताचे मिश्रण करुन जोरदार गाणी तयार करत असतो. हुसम असीमची एकूण संपत्ती ही कोणत्या मोठ्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. 

Add Zee News as a Preferred Source

त्याने अगदी 17 ते 18 वर्षाचा असताना रॅप सोन्गवर प्रभुत्व मिळवले आणि 2003 मध्ये व्यावसायिकरित्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. धुरंधरमधील त्याचे 'फसला' हे गाणे गेल्या वर्षी प्रदर्शित झाले. 2024 मध्ये त्याने बहरीन आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार देखील जिंकला. त्याच्या इतर प्रसिद्ध गाण्यांमध्ये 'शुफा,' 'शिनो अलकलम हथा,' 'अँटी जमीला,' आणि 'नैदा"' यांचा समावेश आहे. फसला नंतर, भारतातही त्याची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली. त्याची बरीच गाणी भारतीयांना समजणारही नाहीत मात्र त्याचा आवाज, गाण्याची शैली आपल्याला नक्कीच एक वेगळी वाईब देईल. 

भारतीयांसाठी असीमचा खास मेसेज
रॅपर हुसम असीम, ज्याला फ्लिपार्ची म्हणूनही ओळखले जाते, त्याने त्याच्या भारतीय चाहत्यांसाठी एक खास मेसेज दिला आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याचा आनंद शेअर करत एका इन्फ्यएन्सरशी बोलतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  फ्लिपार्चीने सांगितले की "त्याचं गाणं भारतात व्हायरल होत आहे. याचा त्याला खूप आनंद होत आहे. हा आंनद शब्दात मांडण्या एवढा नाही."

हे ही वाचा: राहुल गांधी 'धुरंधर'चे निर्माते? थिएरमध्ये सगळेच कन्फ्युज; '99 निवडणुका हरल्यानंतर...'

एकूण संपत्ती किती?
फ्लिपार्ची त्याच्या गाण्यांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावतो. काही माध्यमांनुसार 2025 मध्ये त्याची कमाई सुमारे 2.25 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. तर 2024 मध्ये त्याने सुमारे 3.80 कोटी रुपये कमावले. त्याचप्रमाणे, त्याने 2023 मध्ये सुमारे १० लाख  तर 2022 मध्ये 4.32 लाखापेक्षा जास्त होती हे पाहता स्पष्ट आहे की हुसमची एकूण संपत्ती कोटीच्या घरात असेल. 

About the Author