)
Aishwarya Rai Old Video : बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळापासूनच अनेक अभिनेत्रींनी ग्लॅमरस आणि साधेपणाचे अनोखे संगम दर्शवले आहेत. त्या काळात अभिनेत्रींची सौंदर्य प्रसाधनांपेक्षा त्यांच्या नैसर्गिक साधेपणावर आणि पूर्ण पोशाखावर जास्त भर दिला जात होता. सध्या मात्र अनेक अवॉर्ड फंक्शन आणि इव्हेंट्समध्ये अभिनेत्रींचा ग्लॅमरस फक्त ड्रेसेस किंवा रिव्हीलिंग लुकपुरता मर्यादित राहिला आहे.
अशातच आता सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो जवळपास 25 वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर स्टेजवर आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायने निळ्या रंगाचा सीक्वेन्स ड्रेस परिधान केली आहे तर करिश्मा कपूर बंद गळ्याच्या काळ्या रंगाच्या कॉस्ट्युममध्ये स्टाइलिश लूकमध्ये दिसत आहे. दोघींची ही सुंदरता आणि साधेपण त्या काळातल्या ग्लॅमरसची खरी ओळख दर्शवत आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्या रायने करण जौहरच्या वडिलांना चित्रपट 'कुछ-कुछ होता है' साठी अवॉर्ड दिला होता. हा चित्रपट शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिकेत 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर या दोघींच्या सौंदर्याची आणि साधेपणाची मोठ्या प्रमाणावर स्तुती केली आहे. काहींनी तर करिश्मा कपूरला अधिक सुंदर म्हटले आहे तर काहींनी ऐश्वर्या रायची सुंदरता प्रचंड सुंदर असल्याचे सांगितले आहे.
एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर या दोघींचा अभिषेक बच्चनशी संबंध होता. करिश्मा कपूरचे लग्न मोडल्यानंतर अभिषेक बच्चनच्या आयुष्यात ऐश्वर्या रायची एन्ट्री झाली. करिश्मा कपूरचे 2003 मध्ये दिल्लीतील संजय कपूरसोबत लग्न झाले. ज्यांचा नुकताच आकस्मिक मृत्यू झाला आहे. तर ऐश्वर्या राय सध्या अभिषेक बच्चनसोबत आनंदात वैवाहिक आयुष्य जगत आहे.
या व्हिडिओने जुने बॉलिवूडचे ग्लॅमरस आणि कलाकारांच्या नैसर्गिक सौंदर्याची आठवण करून दिली आहे. चाहत्यांमध्ये ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरच्या स्टाइल आणि साधेपणाला खूप पसंती मिळाली आहे.
FAQ
व्हायरल व्हिडिओ कशाबद्दल आहे?
हा २५ वर्षांपूर्वीचा (१९९९ च्या सुमाराचा) व्हिडिओ आहे, ज्यात ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर अवॉर्ड फंक्शनच्या स्टेजवर दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोघींचे नैसर्गिक सौंदर्य आणि साधेपणा प्रेक्षकांना भावतोय.
व्हिडिओ कोणत्या इव्हेंटमधील आहे?
हा व्हिडिओ झी सिने अवॉर्ड्स १९९९ चा आहे, ज्यात ऐश्वर्या रायने करण जौहरच्या वडिलांना (यश जौहर) ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटासाठी अवॉर्ड दिला होता. करिश्मा कपूरही तिथे उपस्थित होती.
ऐश्वर्या रायचा लूक कसा होता?
ऐश्वर्या रायने निळ्या रंगाचा सीक्विन्स ड्रेस परिधान केला होता, जो तिच्या नैसर्गिक सौंदर्याला पूरक ठरला. तिचे साधे मेकअप आणि हसू प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे होते.