37 वर्षांची मेहनत आणि एकही मोठा पुरस्कार नाही, धर्मेंद्र यांचा प्रामाणिक कबुलीजबाब, Video व्हायरल

अनेक सुपरहिट चित्रपट देऊन आणि 300 हून अधिक चित्रपट करूनही धर्मेंद्र यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सर्वोत्कृष्ट प्रतिभासाठी फक्त एक पुरस्कार मिळाला.  

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 12, 2025, 09:39 PM IST
37 वर्षांची मेहनत आणि एकही मोठा पुरस्कार नाही, धर्मेंद्र यांचा प्रामाणिक कबुलीजबाब, Video व्हायरल

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र ज्यांना जगभरात ‘ही -मॅन ऑफ बॉलिवूड’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कुणालाच शंका नाही. परंतु त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दी असूनही, धर्मेंद्र यांना कधीच ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार मिळाला नाही. त्यांनी अनेकदा स्वतः याबाबत खुल्या मनाने बोलत, “पुरस्कार न मिळाल्याची खंत आहे, पण प्रेक्षकांचं प्रेम हेच माझं खरं पारितोषिक आहे,” असं सांगितलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

 सुरुवात केवळ 51 रुपयांपासून

धर्मेंद्र यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 1960 साली झाली. त्यांना पहिल्याच चित्रपटात ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी घेतले गेले आणि त्यांना त्या भूमिकेसाठी फक्त 51 रुपये मानधन मिळाले. हा त्यांचा हिरो म्हणून पहिला चित्रपट ठरला.

थोड्याच काळात त्यांची मेहनत आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले. त्यांना ‘गरम धरम’ हे टोपणनाव मिळाले आणि 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते मोठे स्टार बनले.

 300 हून अधिक चित्रपट, पण एकच पुरस्कार

धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील काही अविस्मरणीय चित्रपट म्हणजे ‘फूल और पत्थर’, ‘शोले’, ‘प्रतिज्ञा’, ‘सत्यकाम’, ‘मेरा गाव मेरा देश’, आणि ‘चुपके चुपके’.

या सर्व यशस्वी चित्रपटांनंतरही धर्मेंद्र यांना करिअरच्या सुरुवातीला फक्त एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बेस्ट टॅलेंट या श्रेणीत. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 पुरस्कारांविषयी धर्मेंद्र यांचं मत

धर्मेंद्र यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे की, पुरस्कार न मिळणं त्यांना पूर्वी खटकायचं, पण आता ते प्रेक्षकांच्या प्रेमालाच सर्वात मोठा सन्मान मानतात.

1997 साली, जेव्हा दिलिप कुमार आणि सायरा बानू यांनी त्यांना 42व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला, तेव्हा धर्मेंद्र यांनी भावनिक भाषणात सांगितलं “मी काम सुरू करून 37 वर्षे झाली होती. प्रत्येक वर्षी मी नवा सूट शिवायचो, जुळणारी टाय शोधायचो, वाटायचं की यावेळी मला पुरस्कार मिळेल, पण मिळालाच नाही.

 माझ्या फिल्म्स सिल्व्हर-ज्युबिली, गोल्डन-ज्युबिली झाल्या, पण पुरस्कार नाही. शेवटी मी ठरवलं की एक दिवस मी फिल्मफेअरला टी-शर्ट आणि हाफ पँट घालून, किंवा फक्त कच्छा घालूनच जाईन!” त्यांनी पुढे सांगितलं की, “शेल्फवर पडलेल्या धुळीच्या ट्रॉफ्यांपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम कितीतरी मौल्यवान आहे.”

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More