'बाबुल की दुआएं' गाणं गाताना मोहम्मद रफी लहान मुलासारखं रडू लागले... कारण

तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी सुनोगे गीत मेरे... हे गाणं प्रसिद्ध गायक मोहम्मद रफीवर यांना एकदम सूट होतं. 

Updated: May 16, 2021, 05:52 PM IST
'बाबुल की दुआएं' गाणं  गाताना मोहम्मद रफी लहान मुलासारखं रडू लागले... कारण

मुंबई :  तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी सुनोगे गीत मेरे... हे गाणं प्रसिद्ध गायक मोहम्मद रफीवर यांना एकदम सूट होतं. दिग्गज गायक रफी साहेबांना कधीच कोणीच विसरु शकत नाही. त्यांची गाणी लोकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत.'शेहंशाह-ए-तरन्नुम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रफी साहेब यांनी एकापेक्षा एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. पण आज आम्ही तुम्हाला मोहम्मद रफी यांच्या गाण्यामागील एक छुपी कहाणी सांगणार आहोत. हे गाणं गाताना रफी जोरजोरात रडू लागले. यापूर्वी कधीही न असं घडल्यामुळे अचानक त्यांना रडताना पाहून तिथली लोकं आश्चर्यचकित झाली.

तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे गाणं गायल्यामुळे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी का रडले? असं का झालं. याशिवाय आम्ही तुम्हाला रफी साहेब यांच्या संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

आपल्या आश्चर्यकारक आवाजाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या मोहम्मद रफी यांनी अनेक हिट गाणी दिली. महंमद रफी यांनी वयाच्या 13व्या वर्षी गायक म्हणून पहिली कामगिरी केली. के.एल. सहगल यांनी त्यांना लाहोरमधील मैफिलीत गाण्याची परवानगी दिली. 1948मध्ये रफी यांनी राजेंद्र कृष्णन लिखित 'सुन सुनो आए दुनिया वालों बापूजी की अमर कहानी'

हे गाणं गायलं. हे गाणं गाताच सुपरहिट होवू लागलं. कारण, त्यांचं हे गाणं ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना त्यांच्या घरी हे गाणं गाण्यासाठी आमंत्रित केलं हे पाहून हे गाणे हिट झालं.

रफी साहेबांच्या खासगी आयुष्याबद्दल बोललो तर त्यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांनी आपलं पहिलं लग्न सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. या लग्नाविषयी फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच माहिती होतं.

जर मोहम्मद रफी यांची सून, यास्मीन खालिद यांचं पुस्तक आलं नसतं तर ही गोष्ट कदाचित कधीच कोणाच्या समोर आली नसती. यास्मीन यांच्या प्रकाशित झालेल्या 'मोहम्मद रफी मेरे अब्बा..एक संस्कार' या पुस्तकात रफी यांच्या पहिल्या लग्नाचा उल्लेख केला आहे.

या पुस्तकात यास्मीन यांनी लिहिलं आहे की, मोहम्मद रफी यांनी वयाच्या 13व्या वर्षी पहिल लग्न आपल्या काकाची मुलगी बशीरन बेगम यांच्यासोबत केलं. या लग्नापासून त्यांचा मुलगा सईदचा जन्म झाला. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.

काही दिवसांतच हे दोघंही वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी बिलकिस यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं. रफीच्या यांच्या दुसर्‍या लग्नामुळे त्यांना तीन मुलगे खालिद, हमीद, शाहिद आणि तीन मुली परवीन अहमद, नसरीन अहमद, यास्मीन अहमद होती. रफी साहेब यांचे तीन मुलगे सईद, खालिद आणि हमीद यांचं निधन झाले.

'नीलकमल' चित्रपटाचे सुपरस्टार गाणे 'बाबुल की दुआँए लेती जा' गाताना रफी खूप रडले. कारण गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता आणि दोन दिवसांनी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. यानंतर या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जर तुम्ही हे गाणे काळजीपूर्वक ऐकलं असेल, तर शेवटी तुम्हाला रफी साहेबांच्या आवाजात फरक जाणवेल. आणि ते हे गाणं गाताना रडू लागले होते.

संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी मोहम्मद रफी यांनी बरीच गाणी गायली. त्यातली चित्रपटांसाठी सुमारे 369 गाणी गायली, ज्यात सोलो186 गाण्यांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी केवळ गाणीच नाही तर अभिनयातही आपला हात आजमावला होता. रफी साहेबांनी 'लैला मजनू' आणि 'जुगनू' चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.