...जेव्हा सलमान खानला गर्लफ्रेंडमुळे सुनील शेट्टीची मागावी लागली होती माफी, आजही इंडस्ट्रीत होते चर्चा

Bollywood Kissa: बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचं (Salman Khan) जर एखाद्याशी शत्रुत्व झालं तर तो त्याला कधीच माफ करत नाही हे आता इंडस्ट्रीत सर्वांना माहिती आहे. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा भाईला सुनील शेट्टीची (Sunil Shetty) माफी मागितली होती.   

शिवराज यादव | Updated: Mar 15, 2025, 04:54 PM IST
...जेव्हा सलमान खानला गर्लफ्रेंडमुळे सुनील शेट्टीची मागावी लागली होती माफी, आजही इंडस्ट्रीत होते चर्चा

Bollywood Kissa: बॉलिवूडमध्ये सलमान खानला (Salman Khan) मानणारा एक मोठा चाहतावर्ग आहे. इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांच्यासाठी सलमान खान गॉडफादर आहे. पण जर सलमान खानशी पंगा घेतला तर बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद होईल अशी भीतीही असते. यामुळे कोणीही त्याच्याशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. यासाठी वारंवार विवेक ओबेरॉयचं (Vivek Oberoi) उदाहरणही दिलं जातं. पण एकदा भाईला आपल्याच एका सह-अभिनेत्याची माफी मागण्याची वेळ आली होती. हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. कोणालाही माफ न करणाऱ्या सलमान खानला एकदा तेव्हाची प्रेयसी सोमी अलीसाठी (Somy Ali) सुनील शेट्टीची (Sunil Shetty) माफी मागावी लागली होती. 

1992 मध्ये बलवान चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडला सुनील शेट्टीच्या रुपात एक नवा अॅक्शन हिरो मिळाला होता. बलवान चित्रपटानंतर सोमी अलीला सुनील शेट्टीसह एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण सोमी अलीने सुनील शेट्टीला नवखा म्हणत चित्रपट करण्यास नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे, तोपर्यंत सोमी अलीने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. सलमान खानची प्रेयसी इतकीच ती काय तिची ओळख होती. 

सोमी अलीने चित्रपट नाकारला असला तरी सुनील शेट्टीला त्याचा फरक पडला नाही. त्याचे एकामागोमाग एक अनेक चित्रपट हिट होत गेले. दुसरीकडे सोमी अलीला तर पदार्पणही करता येत नव्हतं. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याआधी ती एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होती. सलमान खानचे आपल्या प्रेयसीच्या करिअरला उभारी देण्याचे प्रयत्नही विफल ठरत होते. 

अखेर 1994 मध्ये सोमी अलीला 'अंत' चित्रपटाच्या माध्यमातून मोठा ब्रेक मिळाला. निर्मात्यांना या चित्रपटात मुख्य भूमिकेत सुनील शेट्टी हवा होता. सुनील शेट्टी तोपर्यंत सुपरस्टार झाला होता. चित्रपटात सोमी अली असणार आहे हे समजल्यानंतर सुनील शेट्टीने चित्रपट करण्यास नकार दिला. निर्माते एका सुपरस्टार अभिनेत्याला गमावू शकत नसल्याने त्यांनी सोमी अलीच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

सलमान खानला हे समजल्यानंतर त्याने तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतली. सलमान खानने सुनील शेट्टीची भेट घेत सोमी अलीच्या वागणुकीसाठी माफी मागितली. यानंतर अखेर सुनील शेट्टी सोमी अलीसोबत काम करण्यास तयार झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.