When Suhana Asked Shah Rukh Khan About Their Religion : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं आणि नेहमीच त्यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करण्यात येतात. यात अनेक बॉलिवूड कपल्स आहेत त्यापैकी एक म्हणजे शाहरूख खान-गौरी खान. या जोडप्याची तर नेहमीच चर्चा होत असते. शाहरुख खान हा मुस्लिम आहे तर गौरी खान हिंदू आहे. त्यांच्या कुटुंबात हिंदू आणि मुस्लिम धर्म दोघांचं पालन करतात आणि प्रत्येक सण हा तितक्याच उत्साहानं साजरा करतात. आता एक वेळ होती जेव्हा शाहरुखला त्याची लेक सुहानानं त्यांच्या धर्मावरून प्रश्न केला होता, तेव्हा शाहरुखनं तिला कशा प्रकारे समजावलं होतं आणि शाळेच्या फॉर्ममध्ये काय लिहिलं होतं? याविषयी शाहरुखनं एका मुलाखतीत खुलासा केला होता.
छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये शाहरुख खाननं पत्नी गौरी, तिचा धर्म आणि तिच्या श्रद्धेबद्दल चर्चा केली होती. शाहरुखनं स्वत: एकदा याविषयी सांगितलं होतं. शाहरुख म्हणाला, 'आमच्यात हिंदू-मुस्लिम असा काही प्रकार नाहीच आहे. माझी पत्नी हिंदू आहे आणि मी मुस्लिम आहे. तर माझी मुलं ही हिंदूस्तानी आहेत.'
शाहरुखनं मग लेक सुहानाच्या शाळेतला एक किस्सा सांगितला. सुहानाला जेव्हा शाळेच्या फॉर्ममध्ये तिचा धर्म काय आहे हे लिहिण्यास सांगितलं तेव्हा शाहरुखनं तिला कसं सगळं समजवलं याविषयी सांगितलं. शाहरुख म्हणाला, 'जेव्हा मुलं शाळेत गेली आणि त्यांना शाळेत लिहावं लागतं की त्यांचा धर्म काय आहे. तेव्हा माझी मुलगी छोटी होती आणि तिनं येऊन मला एकदा विचारलं देखील की बाबा आपला धर्म कोणता आहे? मी त्यात हेच लिहिलं की आम्ही भारतीय आहोत, कोणताही धर्म नाही आणि नसायला हवा.'
हेही वाचा : अवनीत कौरसोबत होळीच्या दिवशी मुलानं केलं घाणेरड कृत्य; खुलासा करत म्हणाली, 'त्यानं माझ्या...'
शाहरुख आणि गौरीचा प्रेम विवाह होता. गौरीला लग्नासाठी मनवण्यासाठी शाहरुखनं खूप प्रयत्न केले. एका मुलाखतीत शाहरुख खाननं सांगितलं की गौरीनं तिच्या कुटुंबाला त्याची ओळख ही अभिनव या नावानं केली होती, जेणे करून कुटुंबाला वाटेल की शाहरुख हा हिंदू आहे. तर जेव्हा लग्न झालं त्यानंतर शाहरुखनं सगळ्यांसोबत एक प्रॅंक करत गौरीच्या कुटुंबासमोर सांगितलं की गौरी कायम बुर्का परिधान करणार आणि तिचं नाव आयशा असेल. त्यावेळी गौरीच्या कुटुंबाला धक्का बसला पण नंतर कळलं की तो मस्करी करतोय आणि सगळए हसू लागले.