)
Rashmika-Vijay devarKonda Engagement: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत स्वतःची वेगळीच ओळख निर्माण करणारी National Crush म्हणजेच रश्मिका मंधाना सध्या दिवाळीच्या खास प्रसंगी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'थम्मा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. अभिनेता विक्की कौशलसोबत 'छावा' चित्रपटानंतर हा तिचा दुसरा हिट चित्रपट ठरत आहे. आजकाल रश्मिका तिच्या या चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.
काय म्हणाली रश्मिका?
विजय आणि रश्मिकाच्या साखरपुड्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्रीने आता त्यावर निराळीच प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी, तिने साखरपुड्याच्या अंगठीचे फोटो अप्रत्यक्षरित्या शेअर केले. चाहत्यांनी रश्मिका मंदानाच्या हातात हिऱ्याची अंगठी पाहून साखरपुडा झाल्याचा अंदाज लावला होता. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. कित्येक वृत्तानुसार, जेव्हा रश्मिका तिच्या 'थामा' चित्रपटाच्या प्रमोशनला उपस्थित होती, तेव्हा तिला विजय देवरकोंडासोबत साखरपुड्याबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्रीने हसून उत्तर दिले, "म्हणजे प्रत्येकाला याबद्दल माहिती आहे...." जरी त्यांनी अद्याप ही बातमी अधिकृत केली नसली तरी, तिच्या या लाजऱ्या उत्तराने चाहत्यांना त्यांच्या आवडत्या जोडप्याचे गुपित कळले आहे.
विजयचं नाव एकताच...
तिच्या या प्रतिसादामुळे चाहत्यांचा आनंद आणखी वाढला आहे. अलिकडेच, 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, निर्माते अल्लू अरविंद यांनीही विजयचा उल्लेख करून रश्मिकाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, "तो (विजय) रिलीजपूर्वच्या कार्यक्रमासाठी येत आहे, बरोबर ना." हे ऐकून रश्मिका लाजली मग हसू लागली. त्यामुळे चाहत्यांना खात्री पटली की दोघं नक्कीच रिलेशनशीपमध्ये असतील. सोशल मीडियावर या जोडीबद्दल खूप उत्सुकता आहे.
पुढच्याच वर्षी बांधतील लग्नगाठ
फेब्रुवारी 2026 मध्ये हे दोघे लग्न करणार असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. असे म्हटले जात आहे की त्यांचे लग्न एक खाजगी समारंभ असेल, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. या जोडप्याने अद्याप लग्नाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, पण, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी या बतमीला दुजोरा दिला आहे. रश्मिका आणि विजय हे दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी असून त्यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
रश्मिकाचं आधी रक्षित शेट्टीशी लग्न मग...
गीता गोविंदम या चित्रपटांमधील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरत होत्या. मात्र रश्मिका मंधानाने यापूर्वी 2017 मध्ये अभिनेता रक्षित शेट्टीशी लग्न केले होते. मत्र काही काळानंतर त्यांनी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यानंतर, रश्मिकाने चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले आणि आता विजयसोबत एक नवीन नाते सुरू केले आहे. तिच्या या निर्णयाने चाहते खूप आनंदी आहेत.