Sanjay Dutt Birthday: 62 वर्षांच्या महिला चाहतीने संजय दत्तच्या नावावर केली होती 72 कोटींची संपत्ती. संजय दत्तने त्या संपत्तीबाबत घेतला होता मोठा निर्णय.

Sanjay Dutt: हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संजय दत्तचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेता आज त्याचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर संजय दत्तचा चाहता वर्ग आहे. पुरुषांप्रमाणे संजय दत्तवर प्रेम करणाऱ्या लाखो महिला आहेत. अशीच एक महिला जिने तिच्या मृत्यूपूर्वी तिची सर्व संपत्ती ही संजय दत्तच्या नावावर केली होती. कोण आहे ती महिला?
संजय दत्तवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका महिला चाहतीने आपल्या मृत्यूपूर्वी आपली 72 कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या नावे केली होती. ही धक्कादायक आणि भावनिक घटना 2018 मध्ये घडली होती. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान संजय दत्तने याबाबत पुन्हा एकदा पुष्टी केली आणि संपत्तीबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं.
72 कोटींचे संजय दत्तने काय केले?
‘Curly Tales’ या माध्यमाशी बोलताना संजय दत्त म्हणाला की, हो, त्याच्या एका महिला चाहतीने तिची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे केली होती. पण मी ती त्यांच्या कुटुंबाला परत केली. ती माझी नव्हतीच. संपत्ती लिहून देणाऱ्या महिलेचं नाव निशा पाटील होतं. त्यांचे वय 62 होते. त्या एका लाइलाज आजाराने ग्रस्त होत्या आणि मृत्यूनंतर संपत्तीचा वारसदार ठरवताना त्यांनी आपल्या कुटुंबाऐवजी संजय दत्त यांनाच सर्वकाही देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी बँकेला अनेक वेळा पत्रं लिहून ही विनंती नोंदवली होती.
संपत्तीची एकूण किंमत सुमारे 72 कोटी रुपये होती. ज्यामध्ये काही फ्लॅट्स, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि अन्य गुंतवणूक समाविष्ट होती. जेव्हा ही माहिती संजय दत्त याच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा तो चकित झाला आणि त्यानी तत्काळ ती मालमत्ता निशा पाटील यांच्या कुटुंबीयांकडे परत केली.
संजय दत्तचे आगामी चित्रपट
सध्या संजय दत्त साऊथ सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय संजय दत्त 'बागी 4', 'धुरंधर' या मोठ्या अॅक्शन प्रोजेक्ट्समध्ये तो झळकणार आहे. 'द राजा साब' आणि 'केडी: द डेविल' या साउथ सिनेमांमध्येही तो महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. नुकताच तो 'हाऊसफुल 5' या चित्रपटात झळकला होता.