सलमानला बॉडीगार्ड शेरा पहिल्यांदा कुठे भेटला, शेराला आता सलमान देतोय ही खास भेट

'जब तक जिंदा रहुंगा, भाई के साथ रहुंगा'...सलमानचा बॉडीगार्ड बनून शेराला २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Updated: May 9, 2021, 03:22 PM IST
सलमानला बॉडीगार्ड शेरा पहिल्यांदा कुठे भेटला, शेराला आता सलमान देतोय ही खास भेट

मुंबई : अनेक सेलिब्रिटींना त्याचे खासगी बॉडीगार्ड्स असतात. पण सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची नेहमीच चर्चा असते. १९९४ पासून सलमानसोबत असलेला शेरा आता सलमानच्या कुटुंबाचा एक सदस्यच झाला असल्याचं म्हणायला हरकत नाही. सलमान कोठेही गेला तरी शेरा त्याच्यासोबत सवली सारखा असतो. 'जब तक जिंदा रहुंगा, भाई के साथ रहुंगा'...सलमानचा बॉडीगार्ड बनून शेराला २७ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकताचं शेराने सलमानसोबत भेट कशी आणि कधी झाली याचा खुलासा केला आहे. 

'राधे' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यापूर्वी व्हयरल बॉलिवूडसोबत झालेल्या संवादात शेरा म्हणाला, 'आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी Whigfield सेक्योरिटी सांभाळत होतो. Whigfield एक हॉलिवूड गायक आहे. दुसऱ्यांदा मी सलमानला भेटलो जेव्हा हॉलिवूड अभिनेता Keanu Reevesला भारतात यायचं होतं..'

पुढे शेरा म्हणाला, 'सलमानसोबत पहिला शो चंदीगडमध्ये केला होता आणि त्यानंतर आम्ही आतापर्यंत एकत्र आहोत. ' १९९४ मध्ये सलमानचा भाऊ सोहेल खानने शेराचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर त्याला सलमानच्या बॉडीगार्डची नोकरी देण्यात आली. त्यावेळी सोहेल खानने शेराला, सलमानसोबतच राहावं लागेल असं सांगितलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत सलमान आणि शेरा एकत्र आहेत.

पुढे शेरा म्हणाला; 'सलमान खान माझा मुलगा टायगरला देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आणि सर्वकही पूर्वपदावर आल्यानंतर सलमान टायगरच्या पदाप्रणाची अधिकृत घोषणा करणार आहे.'  त्यामुळे शेरासाठी सलमानकडून खास भेट असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सलमानने 'बॉडिगार्ड' चित्रपट शेराला समर्पित केले होता. 

शिवाय सलमानच्या सांगण्यावरून त्याने २०१७ साली विझक्राफ्ट ही इव्हेंट कंपनी सुरु केली असून टायगर सिक्युरिटी नावाने आणखी एक कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी स्टार्सना सुरक्षा पुरविण्याचे काम करते.