Rinku Rajguru, Lalit Prabhakar: सहा वर्षापूर्वी म्हणजेच 2016 ला प्रदर्शित झालेला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट (Sairat) चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात धुमाकूळ घातला. या सिनेमाने चित्रपटसृष्टीला दोन नवे सितारे दिले. एक म्हणजे आकाश ठोसर (Akash Thosar) आणि दुसरी म्हणजे सर्वांची लाडकी आर्ची. या चित्रपटातूनच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. अशातच आता रिंकू राजगुरू कोणाच्या प्रेमात पडली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरतोय एक फोटो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव असतो. त्यामुळे त्याच्या पोस्टची नेहमी चर्चा होताना दिसते. अशातच ललित प्रभाकरने एक हटके पोस्ट केलीये. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन फोटो शेअर केले. फोटोंमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये या मुलीचा चेहरा दिसत नाही. ललितच्या खांद्यावर डोकं ठेवून ही मुलगी बसलेली दिसत आहे. 'Big News, Stay Tuned' असं कॅप्शन ललितने यावेळी दिलंय. त्यामुळे आता या फोटोतील मुलगी रिंकू राजगुरू असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता रिंकू आणि ललित प्रभाकरचं नाव चाहत्यांनी जोडण्याचा प्रयत्न केलाय.


आणखी वाचा - The Kerala Story चा वाद काही संपेना, प्रदर्शनाआधीच चित्रपटातल्या 10 दृश्यांवर कात्री


ललित प्रभाकर-रिंकू राजगुरू रिलेशनशीपमध्ये?


ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) रिलेशनशीपमध्ये आहेत का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. तुम्हालाही तसं वाटत असेल तर थांबा! या निव्वळ अफवा असल्याची माहिती समोर येतीये. ललित आणि रिंकू अशी जोडी आगामी एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यात आयोजित बैलगाडा शैर्यतीमध्ये दोघेही दिसले होते. त्यामुळे दोघेही एकाच चित्रपटासाठी काम करत असल्याचं निश्चित झालं होतं. खिल्लार (Khillar) असं या चित्रपटाचं नाव असल्याची माहिती समोर आलीये.


पाहा पोस्ट - 



दरम्यान, ललितच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपणारी अभिनेत्री ही रिंकूच असल्याचं जवळपास निश्चित आहे. मात्र, आता ललित लवकरच कोणती खुशखबर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  बैलगाडा शर्यत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय. याच विषयावर 'खिल्लार' चित्रपटातून विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. रिंकू आणि ललित या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र आल्याने अनेकांच्या उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.