Who Is Sonam Chhabra : बॉलिवूड अभिनेत्री सोनम छाबडाही कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दुसऱ्यांदा पोहोचली आहे. सोनम तिच्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनमनं ना फक्त फॅशननं सगळ्यांचं लक्ष वेधलं तर तिनं परिधान केलेल्या कपड्यांवर असलेल्या एका संदेशामुळे देखील ती चर्चेत आली आहे. दहशतवादी हल्ल्यात श्रद्धांजली देत कॅप परिधान केला. तिच्या ड्रेस आणि ओव्हरऑल लूकला सोशल मीडियावर संमीश्र प्रतिक्रिया मिळाली आहे.
सोनम छाबडा ही एक टीव्ही मॉडरेटर आणि कंटेन्ट क्रिएटर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनुभव आणि गोष्टी सांगताना दिसते. जे तिच्या मानसिक आरोग्य, जीवनशैली, आत्म-विकास आणि अनेक गोष्टींना प्रेरित अशा अनेक गोष्टी शिकवताना दिसते. सोनम छाबडानं रेड कार्पेटवर एक ड्रामॅटीक ड्रेस परिधान केला होता. ज्याचं नाव तिनं 'फीनिक्स राइजिंग' ठेवलं. तिनं तिचा ड्रेस कम्पलीट करण्यासाठी फॉइलचं ब्लाऊज बणवून ते परिधान केलं आहे. तिनं या ब्लाऊजला पांढऱ्या रंगाच्या स्कर्टसोबत स्टाईल करून ते परिधान केलं होतं. तर सोनमच्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले. कारण तिनं जो केप परिधान केला आहे त्यात ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्यांची नावं आहेत. अर्थात 2008 मुंबई, 2016 उरी, 2019 पुलवामा आणि 2025 पहलगाम ही ठिकाणांची नावं लिहिली आहेत.
अनेक लोकांनी जागरुकता वाढवण्यासाठी रेड कार्पेटचा वापर केला आहे. सोनमची स्तुती करत अनेकांनी तिला मिळालेल्या या संधीचा कसा वापर केला याविषयी सांगितलं. तर इतरांनी रेड-कार्पेटचा तिनं राजतीय गोष्टींवर मत मांडण्यावरून तिला ट्रोल केलं आहे. त्यामुळे सोनमच्या कपड्यांवरून दोन वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या वादावर आता सोनमनं तिची स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे सगळीकडे तिची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : 'आज हे प्रकरण दाबलं तर पुन्हा पद- पैशाचाच विजय होईल'; अश्विनी महांगडेसह कलाकार वर्गाचा संताप
दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली तर त्यांच्यासोबत अनेक सोशल मीडिया स्टार्स देखील दिसले. त्यांच्यापैकी एक म्हणजे 'लापता लेडीज फेम' 17 वर्षांची नितांशी गोयल आहे.