बॉलिवूडची नवी ड्रीम गर्ल, हेमा मालिनींची हुबेहूब प्रतिकृती? व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. जी दिसायला हुबेहूब हेमा मालिनी सारखी दिसते. कोण आहे ही मुलगी?   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 6, 2025, 07:06 PM IST
बॉलिवूडची नवी ड्रीम गर्ल, हेमा मालिनींची हुबेहूब प्रतिकृती? व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Charul Uppal : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांना कोण ओळखत नाही! त्यांच्या अप्रतिम सौंदर्याने, मोहक हास्याने आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वाने त्यांनी दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, आता सोशल मीडियावर अशी एक मुलगी समोर आली आहे जिला पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत. कारण ती दिसायला अगदी हेमा मालिनींच्या हुबेहूब प्रतिकृतीसारखी आहे.

Add Zee News as a Preferred Source

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मुलीचे नाव आहे चारुल उप्पल. तिच्या व्हिडिओंमध्ये तिचा चेहरा, भाव-भावना, स्मितहास्य आणि सिंपल लूक हे सर्व काही हेमा मालिनींच्या लूकशी अगदी जुळते आहे. पारंपरिक साडी, नाजूक दागिने आणि विंटेज हेअरस्टाइलमध्ये चारुलला पाहून अनेकांना वाटले की, 'ही खरी हेमा मालिनीच आहे का?'

इन्स्टाग्रामवर चारुलचे जबरदस्त व्हिडिओ

चारुलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात ती जुन्या बॉलिवूड गाण्यांवर रील्स तयार करताना दिसत आहे. तिच्या नैसर्गिक हावभावांमुळे लोक चकित झाले आहेत. एका चाहत्याने तिच्या या व्हिडीओवर कमेंट केली की, 'अगदी हेमा मालिनींसारखी दिसतेस तू!' तर दुसऱ्याने मजेत लिहिलं की, 'धर्मेंद्रसुद्धा पाहून गोंधळतील की खरी बायको कोण!' 

चाहते म्हणतात 'हीच नवी ड्रीम गर्ल!' या व्हिडिओंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओसंडून वाहत आहेत. काहींनी तिला थेट ‘नवी ड्रीम गर्ल ऑफ बॉलिवूड’ असे नाव दिले आहे. तिचा क्लासिक 70 च्या दशकातील लूक पाहून अनेकांना जुन्या हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ आठवला आहे.

बॉलिवूडमध्ये मिळेल का संधी?

चारुल उप्पलचा हा लूक आणि सौंदर्य पाहता अनेकजण म्हणत आहेत की तिला बॉलिवूडमध्ये नक्कीच संधी मिळायला हवी. तिच्या लोकप्रियतेने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आता पाहायचे हेच की चारुल खरंच ‘नवी ड्रीम गर्ल’ बनते का!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोशल मीडियावर चारुल उप्पलाचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्याच बरोबर ती जुन्या गाण्यावर रील्स व्हिडीओ तयार करते. तिच्या या व्हिडीओंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. तिचं सौंदर्य आणि अभिनय पाहून चाहत्यांनी तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळण्याची मागणी केली आहे. 

FAQ

चारुल उप्पल कोण आहे?

चारुल उप्पल ही सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली एक इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आहे. ती प्रामुख्याने इन्स्टाग्रामवर जुन्या बॉलिवूड गाण्यांवर रील्स तयार करते. तिच्या लूक आणि एक्सप्रेशन्समुळे लोक तिला बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीची हुबेहूब प्रतिकृती म्हणतात.

चारुल उप्पलच्या कोणत्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला?

चारुलचे पारंपरिक साडीतील आणि क्लासिक 70 च्या दशकातील स्टाइलमध्ये तयार केलेले व्हिडिओ विशेष लोकप्रिय झाले आहेत. जुन्या हिंदी गाण्यांवर तिचे हावभाव, स्मितहास्य आणि एक्सप्रेशन्स हेमा मालिनींसारखे असल्याने ते व्हायरल झाले.

चारुल उप्पलला बॉलिवूडमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे का?

सध्या तरी चारुलने कोणताही चित्रपट साइन केला नाही, पण तिच्या लोकप्रियतेमुळे आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे चाहत्यांना वाटते की ती लवकरच बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडू शकते. अनेकांनी तिला “नवी ड्रीम गर्ल” म्हणून संबोधले आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More