मराठी मनोरंजन क्षेत्रातील चमकता चेहरा प्राजक्ता माळी आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करून आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिची निवेदिका म्हणूनची भूमिका, तिचा उत्साही स्वभाव आणि मंचावरील आत्मविश्वास प्रेक्षकांना नेहमी भावतो. अभिनयाप्रमाणेच प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला फोटो, व्हिडिओ किंवा स्टोरी चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.
अलीकडेच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक स्टोरी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिने trulylovedose या पेजवरून शेअर केलेला 'Who Really is a Gold Digger?' हा व्हिडिओ प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक जनमानसाला सवय असलेल्या ‘गोल्ड डिगर’ या संकल्पनेवर या व्हिडिओमध्ये अत्यंत वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, समाजात ‘गोल्ड डिगर’ म्हणून स्त्रियांचे नाव घेतले जाते, पण वास्तवात अनेकदा पुरुषच खरे गोल्ड डिगर असतात—कारण ते आपल्या पार्टनरने प्रेमाच्या नात्यात स्वतःसाठी सर्वकाही त्याग करावा अशी अपेक्षा करतात. व्हिडिओमध्ये पुढे उदाहरणांसह सांगितले गेले आहे. एक स्त्री घरातील जवळपास सर्व जबाबदाऱ्या सांभाळते खाणे-पिणे बनवणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे, मुलांना वाढवणे, त्यांच्या अपॉईंटमेंट्स सांभाळणे, शाळा- कॉलेजची जबाबदारी, कुटुंबातील भावनिक ताणतणाव हाताळणे या सर्व गोष्टी सातत्याने तिच्या खांद्यावर असतात. त्यासोबतच ती नोकरीही करते, आणि घरखर्चासाठी आर्थिक योगदानही देते—तरीही बऱ्याच वेळा याची कदर केली जात नाही. आणि एवढे काही करूनही, ती "चांगली स्त्री नाही" असे ऐकावे लागते, हे व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.
व्हिडिओतील निवेदक पुढे म्हणतो 'तुमची पार्टनर तुमची आई नाही. आई सर्वकाही त्याग करते, पण पत्नी किंवा पार्टनर तुमची बरोबरीची साथीदार आहे. तुम्ही तिचा आदर केला पाहिजे. नाहीतर ‘गोल्ड डिगर’ तुम्हीच आहात.' ही तीव्र पण वास्तववादी मांडणी प्राजक्ताने शेअर केल्याने चर्चेचा विषय बनली आहे.
प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
काहींनी नातेसंबंधातील जबाबदारीचे संतुलन आवश्यक असल्याचे लिहिले आहे. काही पुरुषांनी वाद घालत आपली भूमिका स्पष्ट केली, तर महिला फॉलोअर्सनी प्राजक्ताला पाठिंबा दिला. एकूणच, या व्हिडिओमुळे नातेसंबंधातील समतोल, आदर आणि जबाबदारीचे वाटप या मुद्द्यांवर नव्याने चर्चेला चालना मिळाली आहे.
FAQ
प्राजक्ता माळीने शेअर केलेला “गोल्ड डिगर” व्हिडिओ काय आहे?
प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘खरा गोल्ड डिगर कोण?’ या मुद्द्यावर भाष्य केले आहे. या व्हिडिओत नातेसंबंधातील असंतुलन, स्त्रियांच्या जबाबदाऱ्या आणि पुरुषांच्या अपेक्षांवर भाष्य केले आहे.
हा व्हिडिओ इतका चर्चेत का आला?
व्हिडिओने पारंपरिक समजुतींना आव्हान दिले आहे. स्त्रियांना ‘गोल्ड डिगर’ म्हणण्यापेक्षा पुरुषच कधीकधी जास्त अपेक्षा ठेवतात, हा मुद्दा स्पष्टपणे मांडल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
चाहत्यांची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे?
चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी व्हिडिओचा संदेश योग्य असल्याचे सांगितले, तर काहींनी नात्यात समतोल आणि आदर आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली. प्राजक्ताने शेअर केल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More
LIVE|
SIN
151/9(20 ov)
|
VS |
INA
22/0(2.3 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.