Allu Arjun Movie Pushpa 2: वर्षअखेरीस म्हणजेच 5 डिसेंबरला जगभरात प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. खूपच कमी काळात म्हणजेच अवघ्या 10 दिवसात या चित्रपटाने बऱ्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. फक्त 16 दिवसात भारतात एक हजार करोड आणि जगभरात 1500 कोटी इतकी गडगंज कमाई करत ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील चाहत्यांकडून या चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळुनही उत्तर भारतातील चित्रपटगृहातून मात्र काढून टाकण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. जगभरात इतक्या गाजलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहातून बाहेर काढण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापैकी 'पुष्पा 2' या चित्रपटाला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. चाहत्यांच्या या प्रेमामुळेच हिंदी भाषेतील या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यातच 600 करोडोंची कमाई केली. हिंदी भाषिक रसिकांनी या चित्रपटाला आणि या चित्रपटातील अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल सारख्या कलाकारांना डोक्यावर घेतलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


हे ही वाचा:  खरच शाहरुख खानने हनी सिंगला कानशिलात लगावली होती का? रॅपरने 9 वर्षांनंतर सांगितलं सत्य


यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री दक्षिणात्य चित्रपटांचे ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी आपल्या अॅक्स हँडलवर ही माहिती सांगितली. 'पुष्पा 2' ला उद्यापासून उत्तर भारतातून बाहेर काढतोय." असं त्यांनी सांगितलं. या बातमीमुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का बसला. 


या पोस्टच्या काही तासांनी सुकुमार आणि पीवीआर यांच्यातील वाद मिटल्याची बातमी समोर आली. त्याचबरोबर आता चित्रपटाचे शो पुन्हा सुरु होत असल्याचं विजयबालन यांनी सांगितलं. हा चित्रपट प्रदर्शनादरम्यान वादांचा सामना करत होता तसेच आता बॉक्स ऑफिसवरील त्याच्या यशानंतरसुद्धा वादांमध्ये अडकत असल्याचं या घटनेवरुन दिसत आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाईचं रेकॉर्ड मोडून जगभरात 1,508 करोडोंची कमाई केली.