तुला तुझं 'दिलीप' हे हिंदू नाव का आवडत नाही? एआर रहमानने स्पष्टच सांगितलं, 'माझं व्यक्तिमत्व...'

AR Rahman Real Name : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर. रहमानच्या खऱ्या नावाबाबत काही चाहत्यांना माहिती नाही. एका मुलाखतीत रहमानने स्वतः त्याच्या जुन्या हिंदू नावाबाबत सांगितलं आहे आणि त्याने ते का बदललं याचं सुद्धा कारण दिलंय.   

पूजा पवार | Updated: Oct 16, 2025, 07:58 PM IST
तुला तुझं 'दिलीप' हे हिंदू नाव का आवडत नाही? एआर रहमानने स्पष्टच सांगितलं, 'माझं व्यक्तिमत्व...'
(Photo Credit : Social Media)

AR Rahman Real Name : दिग्गज संगीतकार आणि गायक ए.आर. रहमानचं (AR Rahman) नाव आणि गाणं ऐकलं नाही असा व्यक्ती कदाचित दुर्मिळच असेल. ए.आर. रहमानला त्याच्या चित्रपट संगीतासाठी एक नाही तर तब्बल दोन पुरस्कार मिळालेत. अनेकांच्या प्ले लिस्टवर दररोज ए.आर. रहमानची गाणी वाजतात. मात्र काहीच फॅन्सला त्याचं खरं नाव माहित असेल. ए.आर. रहमानचं खरं नाव हे 'दिलीप कुमार राजगोपाला' असं होतं, त्याचा जन्म हा 1967 रोजी मद्रास, तामिळनाडू येथे झाला होता. पण ए.आर. रहमाननं त्याचं हिंदू नाव का बदललं याचं कारण एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

का बदललं हिंदू नाव?

ए.आर. रहमानचा जन्म हा हिंदू कुटुंबात झाला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने त्याचं नाव दिलीप कुमार असं ठेवलं होतं. मात्र रहमान अवघ्या ९ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदललं असं रहमानने एका मुलाखतीत सांगितलं. काही वर्षांनी रहमानच्या कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला. रहमानला वाटू लागलं की त्याचं मूळ नाव हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे प्रतिनिधित्व करत नाही. रहमान म्हणाला की, 'मला माझं नाव कधीच आवडलं नाही. यात मला महान अभिनेते दिलीप कुमार यांचा कुठेही अनादर नाही, पण मला माझं दिलीप कुमार हे नाव आवडायचं नाही. माझे नाव माझ्या स्वतःच्या प्रतिमेशी जुळत नव्हते'.

ए.आर. रहमान हेच नाव ठेवायचं कसं ठरलं?

ए.आर. रहमानची आई त्याच्या बहिणीच्या लग्नासंदर्भात एका ज्योतिषाकडे गेली होती. तेव्हा रहमानच्या डोक्यात नाव बदलण्याचा विचार घोंगाळत होताच. तेव्हा ज्योतिषाने रहमानमध्ये काहीतरी विशेष आहे असं सांगितलं आणि त्याला दोन नवीन नावं सुचवली. त्यातील एक नाव होतं अब्दुल रहमान आणि दुसरं नाव होतं अब्दुल रहीम. रहमान म्हणाला की, 'मला त्यांनी सुचवलेल्या नावांपैकी रहमान हे नाव फार आवडलं. त्यानंतर त्याच्या आईने 'अल्लाहरखा' असे लिहिलं, ज्याचा अर्थ 'देवाने संरक्षित केलेले' असा होतो आणि तेव्हा ए.आर. रहमान या नावाचा जन्म झाला.

FAQ : 

ए.आर. रहमानचं खरं नाव काय होतं आणि त्याचा जन्म कधी-कुठे झाला?
उत्तर: ए.आर. रहमानचं खरं नाव ए. एस. दिलीप कुमार (किंवा दिलीप कुमार राजगोपाला) असं होतं. त्याचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी मद्रास (आता चेन्नई), तामिळनाडू येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्याचे वडील आर. के. शेखर हे मल्याळम चित्रपटांसाठी संगीतकार आणि कंडक्टर होते.

 ए.आर. रहमान आणि त्याच्या कुटुंबाने इस्लाम कधी आणि का स्वीकारला?
उत्तर: ए.आर. रहमान आणि त्याच्या कुटुंबाने १९८९ मध्ये, जेव्हा तो २३ वर्षांचा होता तेव्हा इस्लाम धर्म स्वीकारला. १९८४ मध्ये त्याच्या धाकट्या बहिणीच्या आजारपणावेळी कादिरी तरीकेशी (सूफी परंपरा) त्याचा परिचय झाला, ज्यामुळे त्याच्या आईवर सूफीवादाचा प्रभाव पडला. आई हिंदू असली तरी कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला गेला. रहमानने एका मुलाखतीत सांगितलं की, सूफी पीरशीची भेट हा बदल घडवणारा मुख्य घटक होता.

 ए.आर. रहमान हे नाव कसं ठरलं?
उत्तर: नाव बदलण्याच्या विचारात असताना त्याच्या आईने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी एका हिंदू ज्योतिषाकडे जाण्याचं ठरवलं. ज्योतिषाने रहमानमध्ये काहीतरी विशेष असल्याचं सांगितलं आणि दोन मुस्लिम नावं सुचवली: अब्दुल रहमान आणि अब्दुल रहीम. रहमानला 'रहमान' हे नाव खूप आवडलं. नंतर त्याच्या आईला स्वप्नात 'अल्लाह रखा' (अर्थ: देवाने संरक्षित केलेले) हे नाव आलं, ज्यामुळे पूर्ण नाव 'अल्लाह रखा रहमान' (ए.आर. रहमान) ठरलं.

 

About the Author