जोहरान ममदानी महापौर होताच आईच्या ‘कामसूत्र’ चित्रपटाची पुन्हा चर्चा; 29 वर्षांपूर्वी भारतात होती बंदी!

जोहरान ममदानीचे नाते हे फक्त भारताशीच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीशीही आहे. अशातच आता त्यांच्या आईच्या 'कामसूत्र- अ टेल ऑफ लव्ह' या चित्रपटातील सीन व्हायरल होत आहेत.   

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 6, 2025, 08:42 PM IST
जोहरान ममदानी महापौर होताच आईच्या ‘कामसूत्र’ चित्रपटाची पुन्हा चर्चा; 29 वर्षांपूर्वी भारतात होती बंदी!

Kamasutra : न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदावर नुकतेच विराजमान झालेले जोहरान ममदानी हे सध्या अमेरिका तसेच भारतातही चर्चेचा विषय बनले आहेत. ते न्यूयॉर्क सिटीचे पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम आणि सर्वांत तरुण महापौर ठरले आहेत. त्यांच्या ऐतिहासिक विजयामुळे त्यांचं नाव सातत्याने सोशल मीडियावर ट्रेंड होतंय.

Add Zee News as a Preferred Source

पण, जोहरान ममदानी केवळ त्यांच्या राजकीय यशामुळेच नाही तर त्यांच्या आई मीरा नायर यांच्यामुळेही चर्चेत आले आहेत. मीरा नायर या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट दिले आहेत. त्यापैकी 1996 मध्ये आलेला ‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’ हा त्यांचा सर्वांत धाडसी आणि वादग्रस्त चित्रपट ठरला होता.

‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’चा पुन्हा सोशल मीडियावर बोलबाला

जोहरान ममदानी यांच्या महापौर विजयाच्या पार्श्वभूमीवर मीरा नायर यांच्या ‘कामसूत्र’ चित्रपटातील सीन आणि फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. अनेक जण जोहरान यांच्या धोरणांपेक्षा किंवा भाषणांपेक्षा त्यांच्या आईच्या या चित्रपटाबद्दल अधिक चर्चा करत आहेत. जवळपास 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आणि भारतात बंदी घालण्यात आलेला हा चित्रपट पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’मध्ये 16व्या शतकातील भारत दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेम, ईर्ष्या, सत्ता आणि स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची कथा सांगतो.

चित्रपटाची कलात्मकता आणि वाद

‘कामसूत्र’ या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी, पोशाख, आणि सेट डिझाइन अत्यंत आकर्षक होते. मात्र, त्या काळात भारतीय समाज इतक्या धाडसी विषयाला तयार नव्हता. चित्रपटात स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याची आणि इच्छेच्या अभिव्यक्तीची मांडणी केल्यामुळे त्याला तीव्र विरोध झाला आणि भारतात त्यावर बंदी घालण्यात आली.

मीरा नायर यांच्या बहुतांश चित्रपटांमध्ये ओळख, लैंगिकता आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध हे विषय अधोरेखित केले जातात. ‘कामसूत्र’ हा त्यांच्या या प्रवासातील सर्वाधिक धाडसी प्रयत्न मानला जातो.

आज, तीन दशकांनंतर, जोहरान ममदानी यांच्या राजकीय यशामुळे त्यांच्या आईचा जुना चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला लोक त्यांचं अभिनंदन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर ‘कामसूत्र’मधील दृश्ये, पोस्टर्स आणि वादग्रस्त चर्चांचा महापूर आला आहे.

FAQ

जोहरान ममदानी कोण आहेत?

जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क सिटीचे नवे महापौर आहेत. ते या पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लिम आणि सर्वांत तरुण महापौर ठरले आहेत. त्यांच्या आई प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर, तर वडील प्राध्यापक महमूद ममदानी आहेत.

‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटाबद्दल काय विशेष आहे?

‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’ हा 1996 साली प्रदर्शित झालेला मीरा नायर यांचा धाडसी चित्रपट आहे. यात 16व्या शतकातील भारतातील प्रेम, ईर्ष्या आणि स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची कथा दाखवली गेली आहे. चित्रपटातील लैंगिकतेवरील मोकळं चित्रण आणि स्त्रीच्या स्वातंत्र्यावरील मांडणीमुळे त्याला भारतात वाद आणि बंदीचा सामना करावा लागला होता.

सध्या हा चित्रपट पुन्हा चर्चेत का आला आहे?

जोहरान ममदानी यांच्या न्यूयॉर्क मेयरपदाच्या विजयामुळे त्यांच्या आई मीरा नायर यांच्या जुन्या ‘कामसूत्र’ चित्रपटाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील सीन, फोटो आणि पोस्टर्स पुन्हा व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोक त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आईच्या कामाविषयी नव्याने चर्चा करत आहेत.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More