'ओळख असणे म्हणजे गुन्हा नाही, एकाला प्रचिती आली की...' अशोक खरातसोबच्या भेटीत काय घडलं? दीपक केसरकरांनी सर्वच सांगितलं

Deepak Kesarkar: अशोक खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया, दीपक केसरकर यांनी दिली आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय.

प्रविण दाभोळकर | Updated: Mar 28, 2026, 09:16 PM IST
'ओळख असणे म्हणजे गुन्हा नाही, एकाला प्रचिती आली की...' अशोक खरातसोबच्या भेटीत काय घडलं? दीपक केसरकरांनी सर्वच सांगितलं
दीपक केसरकर

Deepak Kesarkar: अशोक खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया, दीपक केसरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात आपली राजकीय द्वेषातून बदनामी केली जात असल्याची टीका केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केली. दरम्यान झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्राचं मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. एक व्यक्ती धर्माच्या नावाखाली, कथित विद्येच्या नावाखाली महिलांचे शोषण करत होता. मी शिवभक्त असल्याने मी देवळात जातो. वयाच्या 15 व्या वर्षापासून मी शंकराच्या देवळात जातो. परदेशात असलो तरी जातो. मित्राच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे गेलो. निव्वळ ओळख असणे हा काही गुन्हा नाही. माझी आणि त्यांची ओळख 3 वर्षापेक्षा जास्त नाही. आपण एक चांगला व्यक्ती म्हणून त्याच्याशी वागत असतो. आम्ही जातो तेव्हा पोलीस असतात. पोलिसांना माहिती असती तर त्यांनी आम्हाला तसे कळवले असते. जोपर्यंत त्यांना अटक झाली नाही तोपर्यंत त्यांची माहीत नसती, असे ते केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे शिर्डीला आले तेव्हा ईशानेश्वर मंदीराला आम्ही गेलो. दुसरा फोटो तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते भेटायला आले. 9 हून जास्त मंत्री, आमदार तिकडे गेलेयत. कोणाला तरी प्रचिती आलेली असते. मग तो दुसऱ्याला सांगतो. जसे सिद्धिविनायकला वैगेरे लोक जातात कारण त्यांना तिथे अनुभव आलेला असतो. एकमेकांना ते नाव सांगितलं जातं. पण मला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलंल जात असल्याचे केसरकर म्हणाले.

मी आसाममध्ये जाऊन महत्वाची भूमिका बजावली. तिथे एकनाथ शिंदे यांची बाजू सांगितली. त्यामुळे दंगली टळल्या. त्यामुळे संजय राऊत, सुषमा अंधारे यांना माझ्याबद्दल राग आहे. राग काढायला दुसरं काही मिळत नाही. त्यामुळे जुने फोटो काढा आणि राग काढा, असे प्रकार घडत असल्याचे केसरकर म्हणाले. अस घडत राहिलं तर मंदिरात जायचीदेखील भीती वाटेल असेही ते पुढे म्हणाले.

मी कार्यक्रमाला मंदिरात गेलो तेव्हा हजारो लोकं तिथे होते, असेही ते म्हणाले. पहिल्यांदा माझी ओळख मंदिरात झाली. पुण्यातील माझ्या मित्राने भेट घडवली. माझी तुलना चाकणकर यांच्याशी केली गेली. ट्रस्टी तिथे असतात. त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट यायला हवी होती. त्यामुळे सर्व ट्रस्टींची चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. लोकांना पैसे देऊन आंदोलन घडवली जातात. माझं नाव गोवणं हे राजकारण आहे. मंदीरात जाण हा संस्कृतीचा भाग आहे. मुलं जन्माला आलं की पत्रिका बनवतो. ज्योतिषशास्त्र या व्यक्तीमुळे बदनाम झाल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली.

खरातच्या कुटुंबाबाबत केसरकरांना काळजी

अशोक खरातवर कारवाई होत असतानाच्या त्याच्या कुटुंबीयांची काळजी वाटते असं माजी मंत्री दीपक केसकरांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावर टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत केसरकरांना जाब विचारण्यात आला. दीपक केसरकरांना खरातबाबत एवढी सहानुभूती कशाला असा थेट टू द पॉईंट जाब विचारण्यात आला. दीपक केसरकरांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या शब्दावरुन माघार घेत असल्याचं सांगितलं. आपला बोलण्याचा तसा हेतू नव्हता असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

सुषमा अंधारेंकडून टीका 

अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना लक्ष्य केलं होतं. अशोक खरातसोबतचे रूपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी काही सवाल उपस्थित केले आहेत. अशोक खरातसोबत केसरकरांचं कोणतं प्लॅनिंग सुरू होतं?, असाही सवाल अंधारेंनी केलाय. एवढंच नव्हे तर याच लोकांनी अशोक खरातला पोसल्याचा गंभीर आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय? त्यामुळे या फोटोंच्या माध्यमातून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी अंधारेंकडून करण्यात आली होती.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More